fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsMAHARASHTRA

परभणी भाजपच्या वतीने बिलावल भुट्टो च्या विरोधात जोरदार निदर्शने

परभणी : भारतीय जनता पार्टी परभणी महानगर तर्फे आज परभणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो ने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्या विरुद्ध तीव्र निषेध आंदोलन,घोषणाबाजी करून पाकिस्तानचा झेंडा व बिलावल भुट्टो चा पुतळा जाळण्यात आला.

यावेळी आंदोलनात परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी,संघटन सरचिटणीस अॅड.एन.डी.देशमुख, बाबासाहेब जामगे, सरचिटणीस संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर, अनुप शिरडकर, भाजपा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव. मधुकर गव्हाणे, प्रशांत सांगळे, विजय गायकवाड, अब्दुल खालेद,माजी नगराध्यक्ष कमलकिशोर अग्रवाल, मंडळ अध्यक्ष मोकिंद खिल्लारे,  मंगल मुदगलकर, सुनिल देशमुख, संदीप जाधव, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रामदास पवार,अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष अतीख पटेल, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा  सुप्रिया कुलकर्णी, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश शेळके, चिटणीस संतोष जाधव, संजय शामरथी, अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष हमी चाऊस, सरचिटणीस सिकंदर खान, कायदा सेल प्रमुख प्रा.नसरीन पठाण, युवा मोर्चा सोशल मिडिया संयोजक माऊली कोपरे,मंडळ अध्यक्ष निरज बुचाले, उपाध्यक्ष वैभव शिंदे, अॅड. हनुमंत सोमवंशी, अभिषेक घंटी, महिला मोर्चा सरचिटणीस पूनम शर्मा,  .पोर्णिमा लोकरे आदी भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते
उपस्थित होते.

Leave a Reply

%d