Monday, June 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

वारकरी संप्रदायातर्फे पुण्यात सुषमा अंधारे यांचा तीव्र निषेध

पुणे : महाराष्ट्रातील वैभवशाली वारकरी संतपरंपरेचा, देवी-देवतांचा अवमान व अपमान करणा-या तसेच टिंगलटवाळी केलेल्या सुषमा अंधारे यांचा समस्त वारकरी संप्रदाय पुणे शहर, परिसर व उपनगरातील संघटनांनी निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाळ-मृदुंग वादन करीत भजन करुन प्रशासन व पोलिसांनी अंधारे यांना योग्य समज देऊन कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

भारतीय वारकरी मंडळ, वारकरी संप्रदाय युवा मंच, अद्वेत वारकरी मंडळ, क्षत्रिय मराठा दिंडी, पश्चिम विभाग वारकरी, भवानी पेठ पालखी मंडळ, कसबा पेठ भजनी मंडळ, पाषाण व बाणेर वारकरी भजनी मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मवीर अध्यात्मिक सेना यांसह शहरातील भजनी मंडळांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते.

संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.माणिक महाराज मोरे, ह.भ.प.शिरीष महाराज मोरे, ह.भ.प. भाऊ महाराज फुरसुंगीकर, ह.भ.प. अक्षय महाराज भोसले, ह.भ.प. माधवी निगडे, मृदुंगाचार्य दातार गुरुजी, सुनील रासने आदी उपस्थित होते.

माणिक महाराज मोरे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे यांच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमांवर फिरत आहे. त्यात त्यांनी वारकरी परंपरेतील संत, सत्पुरुष महात्मे यांच्याविषयी अवमानकारक भाषा वापरली आहे. त्यामुळे संतांचा अपमान, अवमान, टिंगल होत आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायात नाराजी व्यक्त होत असून त्यांच्यावर कारवाई व्हावी.

अक्षय महाराज भोसले म्हणाले, ज्या पक्षातील नेते वारकरी संप्रदायाच्या संतांविषयी वाईट उद््गार काढत आहेत. त्या पक्षाला वारकरी संप्रदाय कधीही मतदान करणार नाही. उद्वव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. तसेच कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. वारकरी संप्रदायातील उपस्थितांनी जिल्हाधिका-यांना मागणीचे निवेदन देखील दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading