वसंत मोरे यांचे समर्थक निलेश माझिरे यांचा शिंदे गटात प्रवेश
पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी पदाधिकारी निलेश माझिरे यांनी मनसेला रामराम ठोकल्यानंतर ते कोणत्या पक्षात जाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. अखेर माझिरे यांनी काल मध्यरात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माझिरे यांच्यावर माथाडी कामगार सेनेच्या पुणे जिल्ह्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
निलेश माझिरे यांना मनसेचे नेते वसंत मोरे यांनी ते शहराध्यक्ष पक्षात प्रवेश दिला होता. तेव्हापासून माझिरे हे मोरेंचे निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. मात्र माझिरे यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांचा आणि आमचा संबंध संपला, अशी थेट भूमिका वसंत मोरेंनी घेतली होती. तर दुसरीकडे मला देखील वसंत मोरेंची गरज नसल्याचे प्रत्युत्तर माझिरे यांनी दिले होते. माझिरे यांच्या जाण्याने मनसेला पुण्यात आता मोठा फटका बसण्याचे चिन्ह आहेत.