fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

सरदार पटेलांच्या ‘संस्कार व शिकवणी विरोधी’ मोदी सरकारची वाटचाल.. काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने, आज शहराध्यक्ष मा अरविंद भाऊ शिंदे यांचे वतीने सरदार वल्लभ भाई पटेल यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
भारताचे १ले उपपंतप्रधान व गृहमंत्री, थोर स्वातंत्र्य सेनानी, लोहपुरूष (स्व) श्री वल्लभ भाई पटेल यांचा चिन कडुन बनवून घेतलेला ऊंच पुतळा हा मोदी सरकारने गुजरात मध्ये बसवला खरा, परंतु वाटचाल मात्र पटेलांच्या संस्कार व शिकवणुकी विरोधी चालली आहे या विषयी खंत वाटते असे ऊदगार सरदार पटेलांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने, काँग्रेस भवन येथे श्रध्दांजली वाहतांना काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी काढले. अध्यक्ष स्थानी पुणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद भाऊ शिंदे होते..!
ते पुढे म्हणाले देशाचे १ ले गृहमंत्री असलेले सरदार पटेल यांनी हिंदुत्ववादी असलेल्या राष्ट्रीय स्व संघाची वाटचाल इतर धर्मियां विरोधी द्वेष पसरवणारी असल्याने संघा वर बंदी आणण्या विषयी तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांना लेखी पत्रा द्वारे सुचित केले होते.. मात्र ते अखेर लोकशाहीचे प्रणेते पं नेहरू होते, ज्यांनी अशा प्रकारे बंदी आणण्यास मनाई केली.
हा सत्य ईतिहास असतांना काँग्रेसने देशात टिकवलेल्या लोकशाहीच्या आधारे सत्तेत आलेल्या मोदी-शहांच्या नेतृत्वाखालील सत्ताधीश मात्र भारताच्या सत्य व वास्तवतावादी इतिहासाचे विकृती करण करीत असल्याचा आरोप देखील काँग्रेस प्रवक्त्यांनी केला..!
या प्रसंगी, प्रदेश महीला काँग्रेस मा. अध्यक्षा कमल व्यवहारे, प्रदेश काँग्रेसचे ॲड अभय छाजेड, मनपा पक्षनेते आबा बागुल, मा महापौर रजनी त्रिभुवन, लता ताई राजगुरू, प्रदेश महीला काँग्रेस उपाध्यक्षा संगिता तिवारी, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, अजित दरेकर, मेहबुब शेख, सेवादल अध्यक्ष प्रकाश पवार, यु काँ अध्यक्ष राहुल शिरसाठ, नरेंद्र व्यवहारे, मेहबुब नदाफ, मुख्तार शेख, द स पोळेकर, सतिन आडेकर, संदिप मोकाटे, भगवान कडु, भुषण रानभरे, शिलार रतनगिरी, सतिंश पवार, रमेश सोनकांबळे, सुजित यादव, रमेश सकट, ऋषीकेश बालगुडे, यशराज पारथी, सचिन भोसले, दिपक ओव्हाळ, इ. ब्लॅाक अध्यक्ष, युकाँ, एनएसयुआय, महिला काँग्रेस इ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते…!!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading