fbpx

नृत्य, नाट्याबरोबरच मुलांमध्ये दडलेल्या लिखाणाला वाव दिला पाहिजे – डॉ. संगीता बर्वे

पुणे : वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे सर्वांचा एक आनंदाचा क्षण. लहान मुलांचे सादरीकरण, त्यांच्यामधील आत्मविश्वास खूप उत्तम होता. विविध गुणदर्शन त्यांनी सादर केले. मुलांमधील नृत्य, नाट्य या गुणांबरोबरच त्यांच्यामध्ये दडलेल्या लिखाणाला वाव दिला पाहिजे, अशी भावना जेष्ठ बालसाहित्यिक डॉ. संगीता बर्वे यांनी व्यक्त करुन बालचमुंचे कौतुक केले.

कोविड नंतर दोन वर्षांनी यंदा हे स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडला. प्रत्येक वर्षी वेगळी संकल्पना घेऊन त्यावर सादरीकरण करणे हे टिळक रोड वरील डी.ई.एस.पूर्व प्राथमिक शाळेचे वैशिष्ट्य. ‘पुणे तिथे काय उणे’ या विषयावर ज्युनियर, सिनियर केजी च्या विदयार्थ्यांनी आपला अभिनय सादर केला.
प्रमुख पाहुण्या म्हणुन बालरंजन केंद्राच्या प्रमुख माधुरी सहस्रबुद्धे व साहित्य एकादमी पुरस्कार प्राप्त, बालसाहित्यिक संगीता बर्वे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद कुंटे, आठवले, प्राजक्ता प्रधान,धनंजय कुलकर्णी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.
पुणे तिथे काय उणे’ या कार्यक्रमातून पुण्यात घडलेला इतिहास जसे, लाल महल मधील शिवाजी महाराज यांनी कापलेली शाइस्तेखानची बोटे, श्रीमंत बाजीराव पेशवै, पारंपरिक सण जसे गणेशोत्सव, मंगळागौर, दिवाळी, संत परंपरा, तसेच सवाई महोत्सव, विद्येचे माहेर, थोर साहित्यिक, पुणेरी पाट्या, लहानपणीचे खेळ आदि विषयांवर मुलांनी उत्तम सादरीकरण केले.
डॉ. संगीता बर्वे म्हणाल्या, प्रत्येक मूल खूप छान आपली कला सादर करत होतं, मला खूप कौतुक वाटलं. सर्व शिक्षकांनी त्यांच्याकडून खूप छान सादर करून घेतलं. मुलांमध्ये लिखाणाची आवड असते. ती ओळखून त्याला वाव दिला पाहिजे. पियूची वही अशीच तयार होत गेली असं सांगून, बर्वे यांनी आपल्या पुस्तकातील गोष्ट मुलांना ऐकविली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिषेक खेडकर यांनी केले. ध्वनी व लाइट व्यवस्था लीना सुमंत व लावण्या आमराळे यांनी संभाळली.

Leave a Reply

%d bloggers like this: