अंकिता रैना, श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्ती यांचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश
बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000 डॉलर महिला टेनिस स्पर्धेत भारताच्या
- दुहेरीत अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश
सोलापूर : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओअॅसिस, प्रिसीजन, जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत बालाजी अमाईन्स सोलापूर ओपन 25000डॉलर महिला टेनिस स्पर्धेत दुस-या फेरीत भारताच्या अव्वल मानांकीत
अंकिता रैनाने झिल देसाईचा तर श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्तीने सौजन्या बाविसेट्टीचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सूरू असलेल्या या स्पर्धेत
मुख्य ड्रॉच्या दुस-या फेरीत भारताच्या अव्वल मानांकीत अंकिता रैनाने 2 तास 20 मिनिट चाललेल्या लढतीत
झिल देसाईचा 6-2, 4-6, 6-4 असा तर श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्तीने सामन्यात पहिल्या सेटमध्ये 6-3 आघाडी घेत आपली बाजू भक्कम केली, दुसरा सेट
सौजन्या बाविसेट्टीने 3-0 असा सोडला.फिनलँडच्या तिस-या मानांकीत अनास्तासिया कुलिकोवाने रशियाच्या केसेनिया लास्कुटोव्हाचा 6-2, 6-1 असा तर रशियाच्या सहाव्या मानांकीत एकटेरिना याशिना हिने भारताच्या सहज यमलापल्ली 6-3, 6-7(5), 6-4 असा संघर्षपुर्ण लढतीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. इंडोनेशियाच्या आठव्या मानांकीत प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहोने
भारताच्या
संजना सिरिमल्लाचा 6-2, 6-0 असा पराभव केला.
दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीत श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती व वैदेही चौधरी या भारताच्या बिगर मानांकीत जोडीने नेदरलँडच्या लेक्सी स्टीव्हन्स व युक्रेनच्या व्हॅलेरिया स्ट्राखोवा या चौथ्या मानांकीत जोडीचा 6-1, 4-6, 10-6 असा पराभव करत दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या
अंकिता रैना व प्रार्थना ठोंबरे या अव्वल मानांकीत जोडीने पोर्तूगालच्या इनेस मुर्त व भारताच्या वासंती शिंदेचा 6-4, 4-6, 10-8 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेचा सविस्तर निकाल-(मुख्य ड्रॉ) एकेरी गट- दुसरी फेरी
अंकिता रैना (भारत)[1] वि.वि
झिल देसाई ( भारत ) 6-2, 4-6, 6-4
एकटेरिना याशिना (रशिया) [6] वि.वि सहज यमलापल्ली (भारत) 6-3, 6-7(5), 6-4
श्रीवल्ली रश्मिका भामिदिपत्ती (भारत)
वि.वि सौजन्या बाविसेट्टी (भारत) 6-3, 3-0(सामना सोडला)
डारिया कुडाशोवा (रशिया) वि. वि एलेना जमशीदी (डेनमार्क) 6-1, 6-2
मनाचाया सावंगकाव (थायलँड) वि.वि ईश्वरी मातेरे (भारत) 6-1, 6-0
प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो( इंडोनेशिया)
[8] वि.विसंजना सिरिमल्ला (भारत) 6-2, 6-0
कतरिना कोझारोव (सर्बिया)वि.वि
रुतुजा भोसले (भारत) 6-1, 6-3
अनास्तासिया कुलिकोवा (फिनलँड )[3] वि.वि केसेनिया लास्कुटोव्हा (रशिया) 6-2, 6-1
दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी
श्रीवल्ली रश्मिका भामिदीप्ती (भारत)/वैदेही चौधरी ( भारत ) वि.वि लेक्सी स्टीव्हन्स (नेदरलँड )/व्हॅलेरिया स्ट्राखोवा (युक्रेन)[4] 6-1, 4-6, 10-6
मनाचाया सवांगकाव(थायलँड)/लानलाना तारारुडी (थायलँड) वि. वि पूजा इंगळे ( भारत )/ईश्वरी मातेरे (भारत ) 6-0, 6-3
अंकिता रैना ( भारत)/ प्रार्थना ठोंबरे ( भारत) [1]वि.वि इनेस मुर्त (पोर्तूगाल) / वासंती शिंदे ( भारत) 6-4, 4-6, 10-8
प्रिस्का मॅडेलिन नुग्रोहो (इंडोनेशिया)/एकटेरिना याशिना (रशिया) [2] वि.वि श्राव्या शिवानी चिलाकलापुडी ( भारत)/जेनिफर लुइखम ( भारत) 6-2, 6-3