fbpx

अमिताभ गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त रितेशकुमार

 

पुणे:राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचाही समावेश असून त्यांना अपर पोलीस महासंचालकपदी (कायदा व सुव्यवस्था) बढती देण्यात आली आहे. अमिताभ
गुप्ता यांच्या जागी आता पुण्याचे नवे पोलीस आयुक्त म्हणून रितेशकुमार हे
असणार आहेत.गुप्ता यांनी शहरातील गुंड आणि गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का, तडीपारी अशा कारवाया केल्याने त्यांचा दबदबा पुण्यात निर्माण झाला होता. दोन वर्षांपूर्वी लाॅकडाऊन काळात त्यांची नियुक्ती झाली होती.
रितेशकुमार हे भारतीय पोलिस सेवेच्या (आयपीएस) 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. ते काही वर्षे औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक होते, त्यानंतर त्यांनी कोल्हापुर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक म्हणूनही काम पाहिले. तेथून रितेश कुमार यांची बदली राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस महानिरीक्षकपदी झाली. तर त्यानंतर ते पदोन्नतीने राज्य वायरलेस विभागाच्या अतिरीक्त पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. तेथे त्यांनी वायरलेस विभागामध्ये अनेक चांगली कामे केली. दरम्यान, तेथून ते राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाच्या अतिरीक्त पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली होती. तर सीआयडी’नंतर त्यांची पुण्याचे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: