fbpx

यंदाचा वत्सलाबाई जोशी पुरस्कार पं. उपेंद्र भट यांना जाहीर

पुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने देण्यात येणारा वत्सलाबाई जोशी पुरस्कार यावर्षी भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं उपेंद्र भट यांना जाहीर झाला असल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी कळविली आहे.

भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या कलाकारांना २००७ सालापासून मंडळाच्या वतीने दरवर्षी सदर पुरस्कार देत गौरविण्यात येते. रोख रु. ५१ हजार व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळाचे क्रीडांगण येथे १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होणा-या ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात पं उपेंद्र भट यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही जोशी यांनी संगितले.

यंदाच्या वर्षी सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांची जन्मशताब्दी साजरी करण्यात येणार आहे. याच वर्षी वत्सलाबाई जोशी पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी न भूतो न भविष्याती असा क्षण असल्याचे सांगत पं. उपेंद्र भट म्हणाले, “मी संगीताचे प्राथमिक धडे हे पं. माधवगुडी यांकडून घेतले. त्या वेळी लहान असताना कर्नाटकातील मंगळूर या माझ्या गावी पं. भीमसेन जोशी यांच्या गायनाच्या मैफली व्हायच्या. माधवगुडी यांच्यामुळेच वयाच्या १७ व्या वर्षी पं. भीमसेन जोशी यांना तानपु-यावर साथसंगत करण्याची संधी मला मिळाली. पुढे १९८० पासून पं. भीमसेन जोशी हयात असेपर्यंत त्यांच्याकडे संगीत शिकणे सुरुच होते. आज माझ्या गुरूने सुरू केलेल्या महोत्सवात वत्सला आई यांच्या नावे माझा सन्मान जन्मशताब्दी वर्षांत होत आहे, हा माझा एकप्रकारे केलेला गौरव आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: