fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषात दत्त जयंती उत्साहात साजरी

पुणे : फुलांच्या आकर्षक सजावटीने सजविलेल्या थेरगाव गणेश नगर येथे स्वयंभू दत्तमंदिरामध्ये बुधवारी संध्याकाळी दत्तजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दत्तमंदिरामध्ये सकाळी समाधी अभिषेक, होमहवन, भजन करण्यात आले. मंदिराचे यंदा अकरावे वर्ष असल्याने पायथ्यापासून कळसापर्यंत मंदिरात फुलांची आरास केली होती. दत्तमहाराजांच्या विलोभनीय मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.

सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी श्री दत्तजन्म सोहळा झाला. भाविकांनी पाळण्यावर पुष्पवृष्टी केली. १५०० पेक्षा अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. विठ्ठल कुदळे, लताताई कुदळे, उत्तम कुदळे, स्वातीताई कुदळे, गोपाळ झगडे, थेरगाव सोशल फाउंडेशन चे अनिकेत प्रभू, गणेशभाऊ बोराटे, यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय महाराज खैरनार यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading