fbpx

गुजरातचा गड भाजपने राखला; भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुणे: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या सर्व 182 विधानसभा जागांचे कल समोर आले आहेत. समोर आलेल्या कलांनुसार, भाजपनं बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप सध्या 147 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप तर्फे पुण्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हा आनंदोत्सव पुण्यात भाजप कार्यालया समोर करण्यात आला. फटाके व व पेढे वाटून आनंदोत्सव करण्यात आला. या आनंदोत्सवा यावेळी भाजप पुणे शहराध्यक्ष
जगदीश मुळीक, गणेश घोष,धीरज घाटे, हेमंत रासणे व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगदीश मुळीक म्हणाले, भाजपने देशात चांगले काम केले आहे. त्यामुळे गुजरात मधील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळाले आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत परत भाजपची सत्ता येणार, असे जगदीश मुळीक म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: