fbpx
Friday, December 8, 2023
Latest NewsPUNE

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मध्ये ट्रेनिंग ऑन व्हीलद्वारे विद्यार्थ्यांना संधी

पुणे   : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी किवळे आणि वोल्वो आयशर यांच्या सहकार्यातून भविष्यातील वाहतूक व्यवस्था या ३ दिवसाच्या अनोख्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कौशल्याधारित उपक्रम सिंबायोसिसतर्फे ८ डिसेंबर २०२२ ते १० डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९. ३० ते ५ या कालावधीत किवळे येथील विद्यापीठाच्या परिसरात राबविण्यात येत आहे
या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी सिंबायोसिसच्या ऑटोमोबाईल इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले .तसेच येत्या १० डिसेंबर रोजी ऑटोमोटिव्ह सेक्टर स्किल डेव्हलपमेंट कौन्सिल व वोल्वो – आयशर कमर्शिअल वेहीकल्स कंपनी, स्कूल ऑफ ऑटोमोबाईल इंजिनीरिंग यांच्या सौजन्याने , पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील १२ वी व डिप्लोमा अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रिक वेहिकल व बी एस – ६ इंजिन चे प्रात्यक्षिक प्रशिक्षण विनामूल्य दिले जाणार आहे . या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी http://bitly.ws/xBhG संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे तसेच अधिक माहितीसाठी ९३५६७१७४३२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

सदरील उपक्रम हा विद्यापीठाच्या ७० टक्के व्यावहारिक आणि ३० टक्के लेखी स्वरूपाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे.या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी सिंबायोसिसच्या ऑटोमोबाईल इंजिनिरिंगच्या विद्यार्थ्यांना ऑटोमोबाईल क्षेत्राशी संबंधित इलेक्ट्रिक , पेट्रोल , डिझेल आणि सीएनजी गाडयांच्या संरचनाबद्दल माहिती देण्यात आली .तसेच विद्यार्थ्यांना व्यावहारिक अभ्यासक्रमासाठी उपयुक्त असणारे वाहनांचे ब्रेक, स्टीयरिंग , इंजिन यांचा परिचय करून देण्यात आला. उपक्रमाच्या दुसऱ्या सत्रात विद्यार्थ्यांना वोल्वो आयशर मध्ये प्रत्यक्षात वाहनांचे मशिन्स , इंजिन पार्टस हाताळण्याची संधी मिळाली.

Leave a Reply

%d