fbpx

उत्तरोत्तर रंगत गेले नीलाद्री कुमार यांचे सतार व उस्ताद जाकीर हुसेन यांचे तबलावादन 

पुणे : नीलाद्री कुमार यांचे सतारवादन आणि उस्ताद जाकीर हुसेन यांचे तबलावादन पुणेकरांसाठी एक रोमांचकारी अनुभूती देणारे ठरले. निमित्त होते सा’ व ‘नी’ सुरसंगीत संस्थेतर्फ आयोजित ‘अमृत संगीत’ उत्सवाचे. डीपी रस्त्यावरील पंडित फार्म येथे सदर कार्यक्रम पार पडला.
 
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात या दोघांच्या सहवादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. येताना राग शुद्धकल्याण प्रस्तुत करू म्हणून आलेलो मी या वातावरणाने भारावून गेलो आहे असे सांगत नीलाद्री यांनी राग यमन मांजमध्ये विलंबित बंदिश सादर करीत आपल्या प्रस्तुतीला सुरुवात केली. दोघांनी केलेले सहवादन आणि जुगलबंदी यांनी रसिकांची मने जिंकली. जसा वातावरणातील गारठा हळूहळू वाढत होता तशाच पद्धतीने या दोघांचे वादन उत्तरोत्तर रंगत गेले. कार्यक्रमाला आलेले रसिक अक्षरशः यामध्ये रंगून गेलेले होते. 
 
या वेळी अपर्णा देशमुख यांच्या अर्पण सोशल फाउंडेशन या वृद्ध व अपंग व्यक्तींसाठी काम करणाऱ्या संस्थेला रुपये दोन लाखांचा निधी ‘सा’ व ” सूर संगीत संस्थेच्या वतीने देण्यात आला. 
 
माजी क्रिकेटपटू चंदू बोर्डे, पंडित उल्हास कशाळकर, ‘सा’ व’ नी’ चे संस्थापक सुरेंद्र मोहिते या वेळी उपस्थित होते. संगीत, नृत्य क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच पुणेकर रसिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 

Leave a Reply

%d bloggers like this: