Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पुणे प्रार्थना समाजात १५२ व्या वार्षिक उत्सवानिमित्त दीपोत्सव

पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिरात आकर्षक रोषणाई

पुणे : “मानवता, समानता, अध्यात्मिकता” ही त्रिसूत्री स्वीकारलेल्या बुधवार पेठेतील पुणे प्रार्थना समाजात दीपोत्सव करण्यात आला. तब्बल १५२ वर्षांचा वारसा असलेल्या प्रार्थना समाजाची वास्तू दिव्यांनी उजळून निघाली.

यावेळी प्रार्थना समाजात उपक्रमोपासना करण्यात आली. पुणे प्रार्थना समाजाचे सचिव डॉ. दिलीप जोग, अध्यक्षा सुषमा जोग, नमिता मुजुमदार यावेळी उपस्थित होत्या. ४ डिसेंबर १९७० रोजी पुणे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिराजवळ प्रार्थना समाजाची वास्तू आहे.

दिलीप जोग म्हणाले, प्रार्थना समाजाच्या आवारात पुणे प्रार्थना समाजाचे अनेक वर्ष अध्यक्ष असलेले रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक दगडी स्तूप बांधण्यात आला आहे. धार्मिक आणि सामाजिक सुधारणांसाठी १८७० मध्ये पुणे प्रार्थना समाजाची स्थापना झाली. पुणे प्रार्थना समाजाचे प्रार्थना सभागृह हरी मंदिर म्हणून ओळखले जाते. १८७८ मध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी दान केलेल्या १७०० चौरस मीटरच्या बुधवार पेठेतील भूखंडावर ते उभारण्यात आले.

प्रार्थना समाजाचे सध्याचे सभागृह नंतर १९०९ मध्ये बांधण्यात आले आहे. हे हरिमंदिर पासोड्या विठोबा मंदिराच्या अगदी उत्तरेला असलेल्या अरुंद गल्लीत आहे. डॉ आर. जी. भांडारकर यांच्या नेतृत्वात १९०७ मध्ये हरि मंदिराचे बांधकाम सुरू झाले होते. भांडारकरांनी या कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांचेही महत्त्वपूर्ण योगदान होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading