fbpx

शहरात लवकरच पाईप लाईनने गॅस पुरवठा : आमदार शिरोळे

पुणे : पुण्याला सर्व सोयी सुविधा देऊन शहरातील नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच शहरात सर्वत्र पाईप लाईन मधून गॅस पुरवठा करून भगिनींची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.

एमएनजीएलच्या वतीने औंध येथे करण्यात आलेल्या पीएनजी गॅस पाईपचे उद्घाटन शनिवारी (दिनांक ३ डिसेंबर रोजी) आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने, माजी नगरसेविका अर्चनाताई मुसळे, माजी नगरसेवक आनंद छाजेड, मा.स्विकृत सदस्य बाळासाहेब रानवडे, शिवाजीनगर भाजप महिला आघाडी सरचिटणीस प्रीतीताई शिरोडे, मधुकर मुसळे, सचिन वाडेकर, अर्जुन खानापुरे आणि विविध गृहनिर्माण संस्थांमधील नागरिक उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार शिरोळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे. मोदीजी यांनी विकासाच्या अनेक योजना आणल्या आहेत. त्यापैकीच एक पीएनजी गॅस पाइपलाइन ही होय. या प्रकल्पाचे औंध येथील पहिल्या टप्याचे लोकार्पण करत असताना आनंद होत आहे. यामध्यामातून या भागातील भगिनींची गैरसोय टळणार आहे. त्यांना १२ महिने २४ तास गॅस उपलब्ध होणार आहे. गॅस बुक करा, मागवा, जोडा या कटकटीतून त्यांची मुक्तता होणार आहे. येणाऱ्या काळात लवकरात लवकर ही योजना आम्ही शहरातील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू.

सुनील माने म्हणाले, गावखेड्यातील महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्वला गॅस योजना आणली तर शहरातील महिलांसाठी पाईपलाईन गॅस ही महत्वाकांक्षी योजना आणली आहे. पुणे शहरात ही योजना राबवण्यासाठी खासदार गिरीश बापट यांनी विशेष प्रयत्न केले. औंध – शिवाजीनगर भागात ही योजना पूर्णत्वास येण्यासाठी आमदार सिद्धार्थ शिरोळे तसेच एमएनजीएलचे संचालक राजेशजी पांडे यांनी पाठपुरावा केला. केंद्रात तसेच राज्यात विकासाचे व्हिजन असलेले सरकार असल्याने शहराच्या विकासासाठी जोमाने प्रयत्न करण्याचे आश्वासन माने यांनी यावेळी दिले.

Leave a Reply

%d bloggers like this: