सदाभाऊ खोत हा भुरटा माणूस – राजू शेट्टी
पुणे:रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी आज एक वादग्रस्त विधान केलंय. ‘राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद’ असं विधान त्यांनी केलंय. त्यावरसदाभाऊ खोत हा भुरटा माणूस. भुरटा माणूस काय बोलतो म्हणून मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही.अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
राजू शेट्टी म्हणाले,मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एफआरपीबद्दल फक्त आम्हाला आश्वासन दिलं आहे. जर त्याचा शासन निर्णय झाला नाही तर आंदोलन करणार. असा इशारा राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला दिलाय.
राजू शेट्टी म्हणाले,किमान हमी भाव कायदा मंजूर करावा या मागणीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत . आज देशातील बहुतांश खातेदार शेतकरी यांची उपजीविका शेतीवर आहे .आम्ही मसुदा तयार केला आहे की हमीभाव ठरवलेल्या प्रमाणे कोणी ही त्याच्या आत कोणी ही माल विकत घेणार नाही . एम एस पी ला हमीभाव मिळण्यासाठी ग्रामसभेचा ठराव करून त्याचे कागदपत्रे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्याकडे ट्रॉली नेणार.असे राजू शेट्टी म्हणाले.
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकाने मोठा निर्णय घेतला आह. सीमाभागातील 865 गावांना मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून अर्थसहाय देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील एकही गाव बाहेर जाणार नाही असे म्हटले आहे. ८६५ गावं आपले आहेत हे सुप्रीम कोर्टात सांगायचे मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे ही सरकार ची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे.या गावांकडे दुर्लक्ष का झाले याचा विचार सरकार ने केला पाहिजे.असे राजू शेट्टी म्हणाले.
