स्कोडा ऑटो इंडियाकडून नोव्हेंबरमध्ये १०2 टक्के वाढीची नोंद
मुंबई : नोव्हेंबर स्कोडा ऑटो इंडियासाठी नवीन शिखरावर पोहोचवणारा महिना ठरला आहे. नुकतेच संपलेल्या आणि भारत व जगभरातील ऑटो तज्ञांचा सहभाग दिसण्यात आलेल्या ‘पीक टू पीक’ मोहिमेनंतर स्कोडा ऑटो इंडियाने गेल्या महिन्यात ४,७५० युनिट्सच्या विक्रीची नोंद केली, ज्यामध्ये गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये विक्री करण्यात आलेल्या 4,433 कार्सच्या तुलनेत १02 टक्क्यांची वाढ दिसून आली.
स्कोडा ऑटो इंडियाने विक्रीमध्ये केलेली वाढ २०२१ च्या वार्षिक विक्रीच्या तुलनेत दुप्पट आहे आणि अजून वर्ष २०२२ संपलेले नाही.
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर सोलक म्हणाले,”आम्ही नुकतेच स्कोडा ऑटो ए.एस.साठी तिसरे सर्वात मोठे मार्केट बनून आमच्या सर्वकालीन उच्च विक्री विक्रमाचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आमच्या नोव्हेंबरच्या विक्रीसह मला सांगताना आनंद होत आहे की, आम्ही यावर्षी आमची वार्षिक विक्री २०२१ च्या तुलनेत दुप्पट केली आहे आणि डिसेंबर महिना अजून बाकी आहे. भारतातील सर्वात सुरक्षित कार म्हणून निवड झाल्यानंतर कुशक आमची पुरस्कार-प्राप्त सेदान स्लाव्हियासह आमच्या वाढीमध्ये अग्रस्थानी आहे. आम्ही सातत्याने आमची वाढीची गती कायम ठेवली आहे आणि नवीन उच्चांकासह वर्ष समाप्त करण्यास उत्सुक आहोत.’’
एकत्रितपणे, जानेवारी ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत स्कोडा ऑटो इंडियाने 48,933 युनिट्सची विक्री केली आहे, जी २०२१ मध्ये वार्षिक विक्री करण्यात आलेल्या २३,८५८ कारच्या दुप्पट आहे. यामुळे कंपनीला २०२२ मध्ये वार्षिक ५०,००० कार्स विक्रीचा टप्पा गाठण्याची आशा आहे.
बिगेस्ट इअर असण्यासोबत भारत स्कोडा ऑटोची जागतिक स्तरावरील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. ग्राहकांवर केंद्रित करणाऱ्या इंडिया २.० धोरणाला अधिक दृढ करत स्कोडा ऑटो इंडियाने क्रांतिकारी सर्वोत्तम व इंटरअॅक्टिव्ह तंत्रज्ञानांसह आपल्या शोरूम्सचे पूर्णत: डिजिटायझेशन केले आहे, ज्यामधून ग्राहकांसाठी कार खरेदी करण्याचा अनुभव अधिक सुधारित करण्यात आला आहे. ग्राहकांशी अधिक संलग्न होणे, आपले नेटवर्क वाढवणे आणि डिसेंबर २०२१ मध्ये १७५ टचॅपाइण्ट्सची संख्या आजच्या तारखेला २२० हून अधिक नेणे या कंपनीच्या ध्येयांमध्ये मदत करण्यासाठी ही बाब प्रमुख स्रोत ठरली आहे.
