Aurangabad : विद्यापीठ कमानी लगतचे प्रति गेट १५ दिवसात हटवा
आंबेडकरी पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांची मागणी
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य कमानी लगत उभारण्यात येणाऱ्या गेट चे बांधकाम 15 दिवसात हटविण्याची मागणी विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी केली आहे.
शेकडो आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सदरील मागणीचे निवेदन कुलगुरूंना देण्यात आले.यावेळी कार्यकर्त्यांची भेट घेऊन कुलसचिव भगवान साखळे यांनी निवेदन स्वीकारले.
कुठल्याही संघटनेची मागणी नसताना इतर मागण्यांना फाटा देत कुलगुरूंनी सुशोभीकरणाचा घाट घालत सुशोभीकरणाच्या नावाखाली मूळ गेट चे महत्व कमी करण्यासाठी इन आउट गेट च्या नावाखाली मूळ गेट पेक्षा अवाढव्य असे प्रति गेट निर्माण केले जात आहे त्यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या जात असल्याने तात्काळ प्रतिगेट रद्द करून बांधकाम हटवावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
या वेळी श्रावण गायकवाड, सचिन निकम, दीपक निकाळजे,राहुल वडमारे, डॉ.संदिप जाधव, गुणरत्न सोनवणे, कपिल बनकर,सोनू नरवडे, विशाल सोनवणे, अविनाश साठे, स्वप्नील शिरसाठ,विक्की जगताप, मनीष नरवडे, सचिन भुईगळ, किशोर खिल्लारे, आनंद कस्तुरे, नवल सूर्यवंशी, मिलिंद दाभाडे, अविनाश कांबळे, संदिप अहिरे, शशी बिराजदार, सुवर्णा किर्तीशाही, अमोल गायकवाड, संतोष ससाणे, शरदचंद्र शेगावकर, जीवन अमराव, विजय मिसाळ, मेघानंद जाधव, दीपक जाधव, दिनेश गवळे, ऍड.अतुल कांबळे, सम्यक सरपे, प्रमोद निकाळजे, सिद्धार्थ शिनगारे, अमोल भालेराव, अनमोल लिहणार, किरण तुपे, कैलास काळे, सागर सोनवणे, अनिकेत चक्रनारायन आदींची उपस्थिती होती.
