पाचव्या थर्डआय करंडक 12वर्षांखलील क्रिकेट 2022 स्पर्धेत 10 संघ सहभागी
पुणे – थर्डआय स्पोर्ट्स अँड इव्हेंट्स एलएलपी यांच्या तर्फे पाचव्या थर्डआय करंडक12 वर्षांखालील क्रिकेट 2022 स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 1 डिसेंबर पासुन सनराईज क्रिकेट अकादमी, शाहू कॉलेज क्रिकेट मैदान येथे होणार आहे.
स्पर्धेत एकूण 10 संघांनी आपला सहभाग नोंदविला आहे. यामध्ये पीवायसी हिंदु जिमखाना, 22यार्ड्स क्रिकेट अकादमी, एनएसएफए(नाशिक), एसपी इलेव्हन, सहारा क्रिकेट अकादमी अ व ब, सनराईज क्रिकेट स्कुल, गॅरी कर्स्टन क्रिकेट अकादमी, फल्लाह क्रिकेट अकादमी, अल्फालुप इलेव्हन या संघांचा समावेश आहे. स्पर्धेत 2 गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटात 5 संघांचा समावेश आहे. ही स्पर्धा साखळी व बाद पध्दतीने खेळविण्यात येणार आहे.
स्पर्धेत विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात येणार असल्याची माहिती स्पर्धा संचालक अभिषेक अग्रवाल यांनी दिली.
