fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनतर्फे नैसर्गिक शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन

३ डिसेंबर रोजी झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय येथे होणार कार्यशाळा

पुणे  : ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनतर्फे ‘ड्रीम ऑफ परमनन्स’ या पर्माकल्चर अर्थात नैसर्गिक शेतीविषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा येत्या शनिवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता तसेच सायंकाळी ४:३० वाजता अशा दोन सत्रात कुडजे गाव येथील झपूर्झा कला आणि संस्कृती संग्रहालय येथे होणार असून, यामध्ये पर्माकल्चर समुपदेशक केतकी फाटक व छायाचित्रकार अभिजित पाटील हे नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

ही कार्यशाळा ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्सम्युलर भवनतर्फे आयोजित ‘क्रिटिकल झोन्स’ या महिनाभराच्या पर्यावरणविषयक प्रदर्शनाचा भाग आहे. पर्यावरणीय समस्यांचा शेतीशी असणारा संबंध व पर्यावरणीय समस्यांमुळे शेतीवर होणारे गंभीर परिणाम लक्षात घेत, नैसर्गिक अथवा शाश्वत शेतीपद्धतीचा अवलंब करण्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता आणण्याच्या हेतूने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या केतकी फाटक  या व्यवसायाने कॉस्च्यूम डिझायनर होत्या. मात्र फॅशन क्षेत्रामुळे होणारे प्रदूषण लक्षात घेत, त्यांनी हा व्यवसाय सोडून नैसर्गिक शेतीचा पर्याय निवडला. गेली काही वर्षे ते महिला गटाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीचा उपक्रम राबवीत असून, यासंदर्भात समुपदेशनही करतात. कार्यशाळेतील दुसरे मार्गदर्शक अभिजित पाटील हे छायाचित्रकार असून, माध्यम क्षेत्रातील अनेक मोठ्या समूहांमध्ये त्यांनी छायाचित्रकार म्हणून काम केले आहे. त्यांच्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी ‘माध्यमातील छायाचित्रण’ याविषयावर मार्गदर्शन केले आहे. सध्या ते पश्चिम घाटात नैसर्गिक शेतीविषयक कार्य करत आहेत.

या कार्यशाळेसाठी प्रवेश विनामूल्य आहे, मात्र संग्रहालयासाठी १०० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading