Friday, August 28, 2026
Latest NewsSports

क्रिक् चॅलेंजर्स करंडक – ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाला विजेतेपद !!

पुणे :  क्रिक् चॅलेंजर्स तर्फे आयोजित ‘क्रिक् चॅलेंजर्स करंडक’ १४ वर्षाखालील मुलांच्या २५-२५ षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत आर्य कुमावत याच्या गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी संघाने पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा २७ धावांनी पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले.

बापूसाहेब शेलार क्रिकेट मैदान (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी), येवलेवाडी येथे झालेल्या या स्पर्धेत आर्य कुमावत याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने विजेतेपदाला गवणसी घातली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीने ३७.५ षटकात १९९ धावा धावफलकावर लावल्या. यामध्ये अव्देत याने ५८ धावा आणि शौनक शेवडे याने ५७ धावांची खेळी केली. या दोघांनी दुसर्‍या गड्याठी ९७ चेंडूत ११६ धावांची भागिदारी करून संघाला १९९ धावा गाठून दिल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीकडून इरा जाधव हिने ९१ धावा करत एकहाती लढा दिला. ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आर्य कुमावत याने ४९ धावात ५ गडी बाद करून प्रतिस्पर्धी संघाची निम्मी फलंदाजी तंबुत पाठवली आणि संघाला विजय सोपा केला. सामन्याचा मानकरी हा आर्यच ठरला.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेचे संचालक नंदकिशोर कुमावत यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्या ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आणि उपविजेत्या पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाला करंडक आणि मेडल्स् देण्यात आली. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सिध्दांत बाफना (२०० धावा, क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी) याला स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, सर्वोत्कृष्ट फलंदाज इरा जाधव (१९८ धावा, पेस अ‍ॅथलेटीक अ‍ॅकॅडमी), सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि उदयोन्मुख खेळाडू आर्य कुमावत (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी, १० विकेट), सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक शौनक शेवडे (ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी) यांना देण्यात आली.

सामन्याचा संक्षिप्त निकालः अंतिम फेरीः
ब्रिलीयन्ट्स स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीः ३७.५ षटकात १० गडी बाद १९९ धावा (अव्देत ५८ (५९, ९ चौकार, १ षटकार), शौनक शेवडे ५७ (७३, ६ चौकार, १ षटकार), स्वराज यादव ४-३२, श्रीवर्तना सुर्यवंशी २-४);(भागिदारीः दुसर्‍या गड्यासाठी अव्देत आणि शौनक ११६ (९७) वि.वि. पेस अ‍ॅथलेटीक क्रिकेट अ‍ॅकॅडमीः ४२.३ षटकात १० गडी बाद १७२ धावा (इरा जाधव ९१ (१२७, १७ चौकार), वेदांत गोरे १७, आर्य कुमावत ५-४९, आदित्य पाबळे ३-२०); सामनावीरः आर्य कुमावत;

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading