fbpx

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे झाले? उदयनराजेंचा राज्यपालांना सवाल

पुणे : राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राज्यातून त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे.आदर्श भारताची संकल्पना मांडणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जुने कसे झाले? राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावाला आधार काय? असा सवाल छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत राज्यपालांना विचारला.

उदयनराजे भोसले म्हणाले,शिवरायांचे विचार जुने झाले, तर मुघलांना एकमेव शिवरायांनी विरोध केला होता. लोकांच्या सन्मानासाठी विरोध केला होता. गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी केला होता आणि हे म्हणतात छत्रपतींचा विचार जुना झाला, अशा शब्दात छत्रपती शिवरायांचे थेट वंशज उदयनराजे भोसले यांनी राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या बेताल वक्तव्याचा समाचार घेतला.

उदयनराजे भोसले यांनी भाजपचे प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांच्या हकालपट्टीची मागणी केली. पुढील भूमिका त्यांनी 28 नोव्हेंबर रोजी स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. यापुढे शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास नेस्तनाबूत करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. उदयनराजे पुढे म्हणाले की, विकृती ही विकृती असते, त्याला जात, पात, धर्म नसतो. उदयनराजे यांनी राज्यपाल विचार जुना झाल्याचे म्हणत असताना व्यासपीठावर असलेल्यांनी आक्षेप का घेतला नाही?शिवरायांचा अपमान होत असताना गप्प का बसता? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
अनेक देशात योद्धे होऊन गेले पण त्यांनी आपल्या लढाया आपल्या साम्राज्यासाठी केल्या, पण शिवरायांनी गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी लढाया केल्या. आधुनिक भारताची संकल्पना त्यांनी त्यावेळीच मांडली. शिवाजी महाराज स्फूर्तीस्थान आहेत. आजपर्यंत कोणाचा आदर्श घेऊन वाटचाल झाली?
त्रिवेदी म्हणाला माफी मागितली, याची बुद्धी भ्रष्ट झाली आहे का? यांना लाज वाटत नाही का? हे सर्व वेदनादायी असून अशा वक्तव्यांनी चीड येते. शिवरायांनी सर्वधर्मसमभावाची मांडणी त्यांनी केली. धर्मस्थळांचा त्यांनी सन्मान केल्याचे उदयनराजे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: