fbpx

अधिसभेच्या उर्वरित पाच जागांचा निकाल जाहीर

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: पहाटे साडेचारपर्यंत अधिकारी, कर्मचारी होते ‘ऑन ड्युटी ‘

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीचा पाच जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. तर उर्वरित पाचही खुल्या प्रवर्गातील जागांचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

खुल्या प्रवर्गातून प्रसेनजीत फडणवीस ४ हजार ४४७, सागर वैद्य ३ हजार ७११ , युवराज नरवडे ३ हजार २८३, दादाभाऊ शिनलकर २ हजार ५११ तर बाकेराव बस्ते २ हजार २३० मते मिळवत विजयी झाले.

परस्पर विरोधी पक्षांमध्ये हा सामना अटीतटीचा झाल्याने या मोजणीच्या सोळा फेऱ्या यावेळी पार पडल्या. खुला प्रवर्ग वगळता उर्वरित प्रवर्गांचे निकाल मंगळवारी सायंकाळी सात पर्यंत जाहीर झाले. खुल्या प्रवर्गाची मोजणी बुधवार पहाटे साडेचार वाजेपर्यंत सुरू होती.

मतमोजणी २२ नोव्हेंबर सकाळी ८.३० वाजता सुरू झाली, तर २३ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता संपली. या मतमोजणी पूर्ण होण्यासाठी वीस तास लागले.

Leave a Reply

%d bloggers like this: