fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNETOP NEWS

वाहतूक नियोजनाबाबत आदर्श ठरणाऱ्या मल्टीलेवल पार्किंग (एरोमॉलचे ) २५ नोव्हेंबरला उद्घाटन

पुणे: प्रवाशांसाठी बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत असलेल्या मल्टीलेव्हल व चारचाकी व दुचाकीसाठी अत्याधुनिक पार्किंगची सुविधा देणाऱ्या एरोमॉलचे शुक्रवार, २५ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार  गिरीश बापट, खासदार  वंदना चव्हाण, आमदार  सुनील टिंगरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती पुणे विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने २०२० साली पेबल्स इन्फ्राटेक प्रायव्हेट लि. च्या सहयोगाने मल्टीलेव्हल पार्किंग प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला.

नव्या मल्टीलेव्हल पार्किंगमुळे पुणे विमानतळावरील पार्किंगचा मोठा प्रश्न सुटणार आहे. १२० कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पाच मजली एरोमॉलमध्ये सुमारे १ हजार चारचाकी व दुचाकींच्या पार्किंगची सोय असणार आहे. केवळ कार पार्किंगच नाही तर येथे प्रवाशांच्या सुविधांसाठी दालने, फुडकोर्ट अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

विमानांची आवागमन स्थिती दर्शविणारे डिस्प्लेज् पार्किंग इमारतींच्या सर्व मजल्यांवर लावण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना विमानांच्या वेळा समजण्यास मदत होणार आहे.

प्रवाशांना मिळणार या सुविधा :
१. मोबाईलअॅप वरून स्लॉट बुक करण्याची सुविधा :
वाहनधारकांना पाच मजली पार्किंग इमारतीमधील पार्किंगची जागा (स्लॉट) निवडणे शक्य असणार आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या पार्किंगचा स्लॉट बुक करता येणार आहे. हे अॅप येत्या महिनाभरात सुरू होईल. या अॅपच्या सुविधेमुळे प्रवाशांची गैरसोय थांबणार आहे. प्रवाशांना सुविधा देताना नव्या संकल्पनांचा विचार करण्यात आला आहे.

पेमेंटसाठी अनेकविध पर्याय – प्रवाशांना फास्टस्टॅग, क्रेडिट कार्ड, पे ऑन फूट, मोबाईल अॅप व्दारे पेमेंट करता येईल.
ज्यामुळे प्रवाशांची सोय व इमारतीतून लवकर बाहेर पडण्यास मदत होणार आहे. तसेच ‘फाईंड माय कार’ तंत्रज्ञान सुविधेच्या माध्यमातून आपली कार कोणत्या मजल्यावर पार्क आहे हे जाणता येणार आहे.

३. गोल्फ कारची सुविधा : विमानतळावर येण्या-जाणाऱ्या प्रवाशांना लिफ्ट, फुट ओव्हर ब्रीज, स्वयंचलित जिन्यांची पुरेशा संख्येने सुविधा आहेतच, त्यासोबतच विमानतळ ते कार पार्किंग दरम्यान जाण्या – येण्यासाठी वृद्धांसाठी पर्यावरणपूरक गोल्फ कार्टची (कार) व्यवस्था करण्यात आली आहे. ही सुविधा पूर्णपणे मोफत असणार आहे.

५. प्रवाशांना सोडण्यासाठी बाहेरून येणाऱ्या चालकांना विश्रांतीसाठी येथे खास विश्रांती कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. तेथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था असणार आहे.
..
२४ तास सेवा
प्रवासी व अन्य नागरिकांकरिता हे पार्किंग बिल्डिंग (एरोमॉल) २४ तास सुरू असणार आहे. येथे त्यांना २४ तास पार्किंग सुविधेसह चांगल्या दर्जाच्या खाद्यपदार्थची चव चाखता येणार आहे. तसेच दुसऱ्या मजल्यावर छोट्या व तातडीच्या व्यावसायिक मिटिंग्जसाठी सशुल्क जागा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
..

ही आहेत वैशिष्ट्ये :
१) ४ लाख ५० हजार स्केअर फूट एवढ्या भव्य पार्किंग इमारतीची (एरोमॉल) निर्मिती.
२) ३ लाख स्केअर फूट जागेचा वापर केवळ पार्किंगसाठी
३) उर्वरित १ लाख ५० हजार स्केअर फूट जागेचा व्यावसायिक वापर.
४) दुसऱ्या मजल्यावरून थेट टर्मिनल क्रमांक एक जवळील प्रस्थान गेट क्रमांक एकवर येता येईल.
५) प्रवाशांच्या सोयीसाठी लवकरच येथे दोन ट्रॅव्हलेटर फुट ओव्हर ब्रीजवर बसविण्यात येणार आहे.
६) इलेक्ट्रिक वाहनांसाठी पार्किंगमध्येच चार्जिंगची व्यवस्था.
७) इमारतीच्या छतावर सौर ऊर्जेचे पॅनल बसविण्यात आले असून ज्यामाध्यमातून निर्माण होणाऱ्या ग्रीन एनर्जीचा वापर इमारतीसाठी होणार आहे. ज्यातून पर्यावरण संरक्षणासाठीचे प्रयत्न केला गेलेला आहे.
८) २४×७ सेक्युरिटी व सीसीटीव्ही कॅमेरे.
९) सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग : पुणे विमानतळावर पहिल्यांदाच प्रवाशांना सशुल्क ‘वॅले’ कार पार्किंग ची सुविधा उपलब्ध असणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading