fbpx

शिंदे – फडणवीस सरकारने उद्योगांनातर आता मंत्रिमंडळ गुजरातला पाठवले – आदित्य ठाकरे यांची टीका

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळांची  बैठक रद्द केली. आधी प्रकल्प पाठवले आता मंत्रिमंडळ पाठवलं, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. आदित्य ठाकरे आज एक दिवसाच्या बिहार  दौऱ्यावर आहेत. बिहारला रवाना होण्यापूर्वी मुंबईत माध्यमांशी संवाद साधना आदित्य ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

आदित्य ठाकरे म्हणाले, आजची मंत्रिमंडळाची बैठक रद्द झाल्याची बातमी मला ऐकू आली. ही बैठक का रद्द झाली तर दुसऱ्या राज्यात प्रचार सुरु आहे. राज्यात ओला दुष्काळ आहे, बेरोजगारी वाढत आहे, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवलेली आहे, पण या मंत्रिमंडळाला आणि खोके सरकारला मंत्रिमंडळ बैठक घेण्यासाठी एक तासही नाही. गुजरातमध्ये निवडणुकीसाठी व्यस्त आहेत. पहिल्यांदा आमदार पाठवले, मग प्रकल्प पाठवले,आता मंत्रिमंडळ पाठवलं. पण महाराष्ट्रासाठी अर्धा तासही नाही. मंत्रिमंडळ गुजरातमध्ये प्रचारासाठी व्यस्त आहे. दुसऱ्या राज्यात प्रचार करावा याबाबत आक्षेप नाही, पण महाराष्ट्रातही मंत्रिमंडळ बैठक महत्त्वाची आहे. ओला दुष्काळ आहे, निकष बदलण्यासाठी उपसमितीची बैठक रद्द झाली आहे. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळाने महाराष्ट्रासाठी एक तास जरी दिला तर काही चुकीचं झालं नसतं, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारने केली.

Leave a Reply

%d bloggers like this: