fbpx

दिशा सालियनचा मृत्यू घातपात नाही – सीबीआय

मुंबई : बॉलीवूड मधील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन (disha salian) हिचा मृत्यू  8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. द इकोनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टॅलेंट मॅनेजर दिशा सालियनचा मृत्यू हा अपघाती होता, असा निष्कर्ष सीबीआयने तपासानंतर काढला आहे.

दारूच्या नशेत तोल जाऊन पडल्यानं दिशाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सीबीआयनं दिली आहे. सीबीआय तपास संस्थेनं दिशाच्या मृत्यूबद्दल माहिती अहवाल हा स्वतंत्रपणे दाखल केला नसला तरी, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासासंदर्भात त्यांनी या प्रकरणाची चौकशी केली.

‘दिशा सालियन प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले होते. दिशा आणि सुशांत हे काही काळ काम केले होते, त्यामुळे  दिशा आणि सुशांत सिंह राजपूत दोन्ही मृत्यूंचा संबंध असल्याचा दावा करण्यात आला होता. तिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात आली आहे.’ एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर द इकोनॉमिक टाइम्सला सांगितलं.

‘तपासात असे समोर आले आहे की, दिशानं तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या घरी  गेट-टूगेदरचं आयोजित केलं होतं. त्याच रात्री मद्य प्राशन केलेल्या दिशाचा तोल गेला आणि ती फ्लॅटच्या पॅरापेटवरून घसरली.’  असंही त्या अधिकाऱ्यानं माहिती दिली.

अधिकाऱ्याने सांगितले की, पार्टीला उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि घटना स्थळाच्या पहाणीचा अहवाल यांचा समावेश करून कसून तपास करण्यात आला, ज्यातून सीबीआयनं हा निष्कर्ष काढला.

दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. त्या रात्री पार्टीसंदर्भात अनेक प्रश्न मांडले गेले. असे म्हटलं जात होत की त्या रात्री एका पक्षाचे एक मोठे मंत्री आणि नेते उपस्थित होते. त्यांचा बचाव करण्यासाठी दिशाच्या हत्येला आत्महत्या असे संबोधले जात होते. पण व्हिडिओत हे देखील स्पष्टपणे दिसून आले आहे की त्या रात्री दिशा आणि तिच्या मित्रांशिवाय दुसरं कुणीही नव्हतं. दिशाच्या पोस्टमॉर्टम अहवालात हे स्पष्टपणे लिहिले आहे की दिशावर बलात्कार झाला नव्हता व दिशा गर्भवतीही नव्हती.

Leave a Reply

%d bloggers like this: