fbpx

इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्याच्या ध्येयात मीशो ओएनडिसीमध्ये सामील

बंगळूर : भारताची तेजीने वाढणारी कॉमर्स कंपनी मीशो ने आज जाहीर केले की, ते खरेदीदारांना  अति-स्थानिक विक्रेत्यांशी जोडून  सर्वसमावेशक ई-कॉमर्स ईको सिस्टम तयार करण्याच्या भारताच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाच्या ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ बरोबर एकीकरण करीत आहेत.

प्रत्येकासाठी इंटरनेट कॉमर्स चे लोकशाहीकरण करण्याच्या मीशो च्या ध्येयाच्या अनुषंगाने या एकीकरणामुळे अति-स्थानिक पुरवठादारांसाठी व्यापक बाजारपेठ तयार करून ग्राहकांसाठी उत्पादनांच्या शोधक्षमतेला चालना मिळून ती वाढेल. पहिले प्रायोगिक काम बंगळूर मध्ये सुरू होईल आणि येत्या काही महिन्यांमध्ये हळू हळू अन्य ठिकाणी आणले जाईल.

मीशो च्या १४ कोटी वार्षिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांपैकी ८०% ग्राहक टीअर २+ शहरांमधून असून आता त्यासह कंपनी संपूर्ण देशभरातली ज्या ग्राहकांना ही सेवा उपलब्ध नाही अशा वापरकर्त्यांना ही सुविधा मिळवून देऊन त्यांची वाढ व्हावी म्हणून महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सध्या ८ लाखांहून अधिक विक्रेते या प्लॅटफॉर्म मध्ये नोंदीत आहेत  आणि त्यापैकी ४०% विक्रेते टीअर २ शहरांमधून आहेत. मिशोने नेहमीच ई- कॉमर्स ला अधिक सर्वसमावेशक बनविण्यावर लक्ष केंद्रित केले आहे आणि आता ओएनडिसी सोबतचे हे एकीकरण कंपनीच्या त्या प्रयत्नांना अधिक गती देईल.

मिशोचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ)  विदित अत्रे म्हणाले की, “लहान विक्रेत्यांना सक्षम बनविण्याच्या आणि अति-स्थानिक व्यवसायांना चालना  देण्याच्या सामायिक उद्दिष्टासह आमचे हे एकीकरण सर्वांसाठी इंटरनेट कॉमर्स चे लोकशाहीकरण करण्याच्या आमच्या प्रयत्नांना चालना देईल. अधिकाधिक ग्राहक ऑनलाइन आणून भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्राचा विस्तार करण्यात ओएनडिसी महत्वाची भूमिका बजावेल. वापरकर्ता अनुभव अखंड आणि सुरळीत आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही ओएनडिसी सोबत एकत्र काम करीत आहोत.”

ओएनडिसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीइओ)श्री. टी कोशी म्हणाले की, “ओएनडिसीमध्ये आमचे ध्येय एक मुक्त ई-कॉमर्स ईको सिस्टम तयार करणे आहे जी प्रत्येकासाठी सेवा देईल. मीशो सोबत या कार्यासाठी जुडताना आम्हाला आनंद होत आहे कारण लहान शहरांमधील तिची सखोल क्षमता एकूण नेटवर्क वाढविणारी गती निर्माण करेल    आणि ओएनडिसीला त्याच्या उद्दिष्टांच्या अधिक जवळ घेऊन जाईल. भारतात ई-कॉमर्स अजूनही लहान आहे आणि ओएनडिसीच्या हे क्षेत्र वाढविण्याच्या प्रवासात मीशो सारखे नवीन प्लॅटफॉर्म आमच्यासाठी एक मजबूत नेटवर्क सहयोगी ठरेल.”

Leave a Reply

%d bloggers like this: