fbpx

प्रभाग रचना बदलणे म्हणजे लोकशाहीची पायमल्ली; जगताप यांची शिंदे व फडणविस सरकारवर टीका

पुणे : राज्यातील 24 महापालिकांच्या प्रभाग रचना नव्याने करण्याचे आदेश राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिले आहेत. राज्य सरकारने तडकाफडकी हा निर्णय घेतला असून ही लोकशाहीची पायमल्ली आहे, असा आरोप पुणे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिंदे व फडणवीस सरकारवर केला आहे.

प्रशांत जगताप म्हणाले, राज्य सरकारने तडकाफडकी रात्री प्रभाग रचना नव्याने करण्याचा निर्णय घेतला. येत्या 28 नोव्हेंबरला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात अंतिम सुनावणी असताना प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेणे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे, असं मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भातील पुरावे असलेले कागदपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहेत. या न्यायव्यवस्थेवर सगळ्यांचा विश्वास आहे, असं देखील ते म्हणाले.

भाजप रडीचा डाव खेळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुका नको आहेत. त्यामुळे त्यांनी प्रभाग रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी किमान 7 ते 8 महिने लागणार आहे. आधीच 8 महिने निवडणुका लांबल्या आहेत आणि या निर्णयामुळे पुन्हा निवडणुका लांबणीवर जाणार आहेत. याचा अर्थ त्यांना या निवडणुका सध्या नको असल्याचं चित्र दिसत आहे.असा आरोपही जगताप यांनी भाजपवर केला आहे

Leave a Reply

%d bloggers like this: