Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

राष्ट्रीय समाज पक्षाची प. महाराष्ट्रची सोशल मीडिया पदाधिकारी प्रशिक्षण व बैठक संपन्न

पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्येकर्त्यानी सोशल मिडीयाचा प्रभावी पणे वापर करून पक्षाचे विचार ध्येय धोरणे सामान्य माणसा पर्यन्त पोहचविण्यासाठी सोशल मिडीयाचा वापर करावा असे आव्हान सोशल मिडीयाचे तज्ञ राजकीय विश्लेषक ओंकार जोशी यांनी केले .

राष्ट्रीय समाज पक्षाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची सोशल मीडिया पदाधिकारी प्रशिक्षण व बैठक पुणे येथे घेण्यात आली .यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते , महासचिव ज्ञानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील ,विद्यार्थी आघाडीचे शरद दडस, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, पुणे जिल्हा शहर विभाग अध्यक्ष विनायक रुपनवर, शिरूर लोकसभा प्रभारी सचिन गुरव, पुणे अध्यक्ष बालाजी पवार, रासपा सोशल मिडीयाचे नितीन शेंडगे, पिंपरी चिंचवड  अध्यक्ष भरत महानवर, युवक जिल्हाध्यक्ष स्वप्निल मेमाने यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रा मधील सोशल मिडीयाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते .

या वेळी सोशल मिडीयाचे ओंकार जोशी यांनी कार्यकर्त्यांना आधुनिक काळामध्ये सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून पक्ष संघटना वाढीसाठी व आपल्या ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवीत सत्ता काबीज करण्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो याचे महत्त्व पटवून दिले .प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या मोबाईल फोन मधून सहजपणे व्हाट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर ,टेलिग्राम, फेसबुक याचा वापर करता आला पाहिजे. 

दुसऱ्या सत्रामध्ये सोशल मीडियाचे तज्ञ हर्षद व्होरा यांनी सोशल मीडिया तंत्र कसे वापरावे त्याचे फायदे आणि तोटे याबाबत सविस्तर माहिती दिली . पत्रकार संजय बारहाते यांनी पदाधिकारी यांनी पत्रकाराशी समन्वय तसेच प्रेसनोट कशी द्यावी या बाबत माहीती दिली .या या कार्यक्रमासाठी पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात युवक पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली

.प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांची ध्येय धोरणे व भूमिका सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम करावे . या वेळी माऊली सलगर, संजय माने, अजित पाटील यांनी मार्गदर्शन केले . नितीन शेंडगे ,ज्योतीराम गावडे ,शैलेश थोरात, समीर चांडे पाटील ,नवनाथ तरडे , सुनीता किर्वे यांनी मोलाचे सहकार्ये केले . बालाजी पवार यांनी स्वागत तर  सचिन गुरव, नितीन शिंगाडे यांनी प्रस्ताविक तर चैतन्य शिंगाडे यांनी सुत्रसंचालन केले .आभार अंकुश देवाडकर मानले .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading