Friday, June 19, 2026
Latest NewsPUNE

रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांचा जम्मू येथे सन्मान

पुणे : पुण्यातील रक्ताचे नाते ट्रस्टचे अध्यक्ष राम बांगड यांचा रक्तदान क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जम्मू येथे सन्मान करण्यात आला. जम्मू येथील इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्युजन इम्युनोहेमॅटोलॉजी या संस्थेच्या वतीने हा सन्मान करण्यात आला. रक्तदान क्षेत्रातील कार्याबद्दल जम्मू येथे सन्मान करण्यात आलेले पुण्यातील ते पहिलेच व्यक्ती ठरले आहेत.

यावेळी जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचे स्वीय सहाय्यक राजीव राय भटनागर यांच्या हस्ते बांगड यांना पुरस्कार देण्यात आला. रक्तदान क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल देशभरातून चार किंवा पाच संस्थांना हा सन्मान दरवर्षी प्रदान करण्यात येतो.

राम बांगड यांनी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून १५० पेक्षा अधिक वेळा रक्तदान, १५ वेळा प्लाझ्मा दान तर २१ वेळा प्लेट लेट्स त्यांनी दान केले आहे. राम बांगड यांच्या कार्याची दखल एक विक्रम म्हणून घेतली गेली आहे. ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये त्यांनी आजवर केलेले प्लाझ्मा दानाचे काम विक्रम म्हणून नोंदवले गेले आहे.

राम बांगड म्हणाले, हा पुरस्कार त्याचे नाते ट्रस्टच्या प्रत्येक सभासदाचा सन्मान आहे. समाजाने आपल्या कार्याची दखल घेतल्यानंतर काम करण्यास आणखी हुरूप येतो असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading