सर्जेराव वाघमारे यांच्या कार्याचा अजित पवार यांच्या हस्ते गौरव
पुणे : भिमा कोरेगाव विजय स्तंभ समिती भिमा कोरेगाव या ऐतिहासिक अशा कोरेगाव भिमा विजय रण स्तंभा च्या माध्यमातून सर्जेराव वाघमारे हे गेली 15 वर्षा पासून सामाजिक आणि विजय स्तंभ बाबत विविध प्रकारचे कार्य करीत आहेत .विशेष बाब म्हणजे गेल्या बऱ्याच वर्षापासून लाखो लोक विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून येत असतात त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा 2017 पर्यंत ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून करीत होते .सद्ध्य जिल्हा प्रशासनाच्या मदतीने वाघमारे यांनी अनेक प्रकारचे उपक्रम व कार्यक्रम ,सेवा , सुविधा करीत आहेत . त्यांच्या या कार्याबद्दल करांतिगुरू लहूजी वस्ताद साळवे स्मारक समितीच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या
हस्ते त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बालगंधर्व रंगमंदिर येथे विशेष सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमास क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती चे अध्यक्ष विजय डाकले,माजी मंत्री रमेश बागवे ,राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप ,आमदार चेतन तुपे ,बाळासाहेब भांडे ,रवी पाटोळे ,शांतीलाल मिसाळ,यासह विविध पक्ष संघटनाचे नेते तसेच कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .
