टीव्ही कलाकारांच्या थंडीतील स्किनकेअरचे गुपित
थंडी जाणवू लागलीय आणि थंडीच्या महिन्यात फक्त आपल्या वॉर्डरोबलाच बदलाची गरज नाहीये तर आपल्या स्किनकेअरलाही सुधारण्याची गरज आहे. संपूर्ण थंडीच्या महिन्यांमध्ये त्वचा आनंदी, मऊसूत आणि चमकदार ठेवण्यासाठीच्या आपल्या अत्यंत सिक्रेट टिप्स सांगत आहेत. नेहा जोशी (यशोदा, दूसरी माँ), कामना पाठक (राजेश, हप्पू की उलटन पलटन) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी, भाभीजी घरपर हैं) या अभिनेत्रींनी आपल्या टिप्स सांगितल्या आहेत.
नेहा जोशी म्हणाली, “कोणत्याही हवामानात तुम्ही भरपूर पाणी प्यायल्याशिवाय त्वचेच्या कोणत्याही उपायांचा फायदा होणार नाही. त्यामुळे माझी सर्वांत महत्त्वाची थंडीतील स्किनकेअर टिप म्हणजे दररोज किमान दोन लिटर कोमट पाणी पिणे ही आहे. त्यामुळे माझ्या त्वचा आणि शरीराला पोषण मिळते. चित्रिकरण असो वा व्यायाम, मी कायम एक पाण्याची बाटली सोबत ठेवते. मला नैसर्गिक आणि ऑर्गेनिक वस्तूंची आवड आहे. तसे फेस ऑइल्स आणि एलोव्हेरा जेल. त्यामुळे माझी त्वचा आर्द्र राहते. भरपूर पाणी पिण्याबरोबरच मी दूध, हळद, मध आणि बेसन यांचे घरगुती फेसपॅक्स वापरते आणि स्क्रब्स देखील वापरते. थंडीतला माझा सर्वांत जवळचा मित्र दही आहे. मी आठवड्यातून दोनदा माझ्या चेहऱ्याला दही लावते. माझी त्वचा आर्द्र राखण्यात मदत करणारा दही हा एक घटक आहे. तो एक हायड्रेटिंग एक्स्फोलिएटर असून त्यामुळे मृत पेशी साफ होतात. त्यामुळे डाग कमी होतात आणि ते क्लिंझर म्हणूनही काम करते. या सर्वांनी त्वचा सुंदर आणि चमकदार होते.”
कामना पाठक म्हणाल्या की, “थंडी हा विषय माझ्यासाठी फार कठीण आहे, कारण माझी त्वचा मुळातच कोरडी आहे. त्यामुळे तापमान कमी होते तसे मी माझे संपूर्ण वर्षभर वापरण्याचे सौंदर्य प्रसाधन बदलून हंगामी वापरण्यास सुरूवात करते. माझ्या आजीने मला मिल्क क्रीम आणि मध वापरण्याचा सल्ला दिला होता. त्याचा माझ्या त्वचेला खूप फायदा झाला. मिल्क क्रीम किंवा साय हे सर्वोत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझिंग क्रीम्सपैकी एक आहे. त्यामुळे तुमची त्वचा मऊसूत आणि सुंदर होते. तुमच्या त्वचेवर मुरूमं आणि पुरळाला कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही मधावर अवलंबून राहू शकता. फक्त एक चमचा दूध, साय आणि मध एका बाऊलमध्ये मिक्स करा. संपूर्ण चेहरा आणि त्वचेवर हे मिश्रण लावून १५ मिनिटे ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून टाका. कोरडी त्वचा असलेल्या स्त्रियांनी हे आठवड्यातून किमान दोन वेळा वापरावे. तुम्हाला तुमची त्वचा थंडीच्या दिवसात खूप सुंदर झाल्याचे दिसून येईल.”
शुभांगी अत्रे म्हणाल्या की, “थंडीच्या दिवसांत तुमची त्वचा सुदृढ ठेवणे हे खूप कठीण काम होऊ शकते. बाहेरच्या थंड हवेमुळे तुमची त्वचा खरखरीत होऊ शकते आणि घरातील गरमीने हवा तुमच्या त्वचेतील आर्द्रता काढून घेतली जाते. पृथ्वीवरील प्रत्येकजण काही ना काही कारणासाठी वनौषधींचा वापर करतो. वनौषधींमध्ये आरोग्य आणि सौंदर्यासाठी, विशेषतः थंडीत अनेक फायदेशीर घटक असतात हे दिसून आले आहे. थंडीतील माझे आवडते वनौषधीचे उपचार म्हणजे एक शक्तिशाली स्किन टॉनिक असलेले गुलाबपाणी होय. त्यामुळे त्वचेच्या पृष्ठभागावरील रक्ताभिसरण सुधारते. गुलाबपाण्यात विविध प्रकारची जीवनसत्वे असतात. त्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम यांच्यासारखी खनिजेही असतात, जी त्वचेच्या पेशींसाठी गरजेची असतात. गुलाबपाणी माझ्या संवेदनशील त्वचेसह सर्व त्वचा प्रकारांसाठी उपयुक्त ठरते. ते थंडीत त्वचा तेलकट न बनवता तिला आर्द्रता देऊ शकते. मी प्रत्येक थंडीच्या हंगामात १०० मिली गुलाबपाणीत एक टीस्पून ग्लिसरिनमध्ये मिसळते. कृपया ते हवाबंद डब्यात ठेवा आणि त्वचा तसेच हातांवरील कोरडेपणा काढून टाकण्यासाठी लावा. मी चित्रिकरण करत असतानाही हे सोबत घेऊन जाते. थंडीचा महिना सुरू झाला आहे. त्यामुळे तुमची त्वचा आणि आरोग्याची काळजी घ्या. थंडीच्या शुभेच्छा.”
