Saturday, June 20, 2026
BusinessLatest News

कल्याण ज्वेलर्सने बालदिनाच्या निमित्ताने लहान मुलांसाठी सादर केली लिमिटेड एडिशन ज्वेलरी

बालदिनाचे औचित्य साधून कल्याण ज्वेलर्सने मुलांसाठी लिमिटेड एडिशन ज्वेलरीची घोषणा केली आहे. एनिमेटेड कार्टून कॅरेक्टर्सपासून निसर्गातील विविध घटकांपर्यंत अनेक गोष्टी या कलेक्शनची प्रेरणा बनल्या आहेत. हे दागिने खूपच अनोखे आणि वजनाला हलके असल्याने मुलांना अगदी सहज घालता येतील असे आहेत. लहान मुलांची आवडनिवड लक्षात घेऊन तयार करण्यात आलेली कल्याण ज्वेलर्सची ही नवी श्रेणी मुलांनी विशेष प्रसंगी सोन्याचे दागिने घालण्याचा ट्रेंड आणण्यात नक्कीच खूप मोठे योगदान देईल.

आज जगभरात आर्थिक अस्थिरता असताना देखील सोन्याच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने सोने हा सर्वात लाभकारी आणि सुविधाजनक गुंतवणूक पर्याय बनला आहे. भारतात बहुतांश ग्राहक सोन्याच्या दागिन्यांमध्ये बरीच गुंतवणूक सातत्याने करत असतात. हे नवेवजनाला हलके दागिने नक्कीच आकर्षक पर्याय आहे.

लहान मुलांना सहज घालता येतील असे हे शानदार आणि सुंदर दागिने खूप लोकप्रिय होतील.

बालदिनाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी कल्याण ज्वेलर्सने सर्व दागिन्यांच्या खरेदीवर २५% पर्यंत सूट आणि स्टोन मूल्यावर सरसकट २५% सूट जाहीर केली आहेही सूट स्टोन मूल्याच्या कमीत कमी १ लाख रुपयांच्या खरेदीवर लागू असेल. संपूर्ण भारतातील सर्व कल्याण ज्वेलर्स शोरूम्समध्ये १५ नोव्हेंबर २०२२ पर्यंत या अनोख्या ऑफर्सचा लाभ घेता येईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading