कोचीला पुण्यातील पर्यटकांची पहिली पंसती
पुणे :- पुण्यातील पर्यटक हे आपल्या केरळ पर्यटनवारीमध्ये ‘कोची’ या शहराला भेट देण्यास प्रथम पसंती देतात. तर त्यानंतर केरळमधील दक्षिण काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या
‘मुन्नार’ या हिल स्टेशनचा क्रमांक लागतो. तर पुण्यातील पर्यटकांनी तिसऱ्या क्रमांकावर पेरियार राष्ट्रीय उद्यानासाठी प्रसिद्ध असलेले ‘थेक्कडी’ हिल स्टेशनला पंसती दिली आहे. शिवाय हाऊसबोट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या ”अलप्पुझा” या केरळातील पर्यटन स्थळाला पुणेकरांनी चौथ्या क्रमांक दिली आहे अशी माहिती केरळ पर्यटन अधिकाऱ्यांनी केरळच्या पर्यटन विभागाच्या वतीने पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रम दिली.
पर्यटन मंत्री पीए मोहम्मद रियास म्हणाले की नुकताच संपलेला सणासुदीचा काळ हा केरळच्या पर्यटनासाठी सकारात्मक होता आणि मोठ्या संख्येने देशांतर्गत पर्यटकांनी राज्याला भेट दिली, ज्यामधून कोविड-नंतरच्या काळात पर्यटनाला मिळालेली उसळी दिसून आली.
ते महणाले ‘’आम्ही केरळमध्ये हिवाळ्यातील सुट्टीच्या मोसमाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहोत, ज्याचा टाइम मासिकच्या ’५० एक्स्ट्राऑर्डनरी डेस्टिनेशन्स ऑफ द वर्ल्ड टू एक्स्प्लोर इन २०२२’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. राज्याचे वेगळेपण पर्यटक वाट पाहत असलेले विविध अनुभव जसे हाऊसबोट्स, कॅराव्हॅन स्टे, जंगल लॉज, वृक्षारोपण भेटी, होमस्टे, आयुर्वेद-आधारित वेलनेस सोल्यूशन्स आणि साहसी उपक्रमांसोबतच परिसरात फेरफटका, हिरवळ असलेल्या टेकड्यांवर ट्रेकिंग यामधून दिसून येते.’’
पर्यटन प्रधान सचिव के. एस. श्रीनिवास म्हणाले की, राज्याच्या पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगाने आधीच महामारीपूर्वीची क्षमता परत मिळवली आहे. ते पुढे म्हणाले, “केरळने चालू वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत देशांतर्गत पर्यटकांच्या आगमनात मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास १९६ टक्क्यांनी वाढ केल्याचे यावरून स्पष्ट होते. केरळमध्ये या सप्टेंबरपर्यंतच्या नऊ महिन्यांत एकूण १,३३,८०,००० देशांतर्गत पर्यटकांची नोंद झाली आहे, ही आकडेवारी कोविड २०१९ पूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत १.४९ टक्क्यांनी वाढली आहे.
पर्यटन संचालक पी. बी. नूह म्हणाले, “आम्ही केरळचे नवीन प्रकल्प तसेच समुद्रकिनारे, हिल स्टेशन्स, हाऊसबोट्स आणि बॅकवॉटर सेगमेंट यांसारख्या मुख्य मालमत्तेचे प्रदर्शन करण्यावर प्रभावीपणे भर देण्यासाठी विस्तृत योजना आखल्या आहेत, ज्यामुळे पर्यटकांना अद्वितीय अनुभव मिळेल.’’
