Friday, May 29, 2026
BusinessLatest News

पुण्यातील प्रीमियम प्रकल्पासाठी गोदरेज प्रॉपर्टीजतर्फे जमिनीचे संपादन

अंदाजे २,००० कोटी रुपये* उत्पन्नाच्या संभाव्य क्षमतेसह या प्रकल्पाची अंदाजे २.२ दशलक्ष चौरस फूट विकसन क्षमता

 

भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकसकांपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (GPL), (BSE scrip id: GODREJPROP) ने मुंढवा-पूर्वपुणे येथे १२ एकर जमीन एकगठा खरेदी केल्याचे आज जाहीर केले. या जमिनीवरील विकास हा प्रामुख्याने प्रीमियम गट गृहनिर्माण प्रकल्पासाठी असेल.

 

पुण्यातील सर्वात मध्यवर्ती निवासी क्षेत्रांपैकी असलेल्या या ठिकाणी भौतिक आणि सामाजिक पायाभूत सुविधांची स्थापना झालेली असून पुणे शहरातील सर्व प्रमुख सामाजिक आणि व्यावसायिक केंद्रांना येथून उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी आहे. कोरेगाव पार्क बाजारपेठेच्या हे अगदी जवळ आहे.

 

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित मल्होत्रा  म्हणाले, “मुंढवा ही पुण्यातील एक महत्त्वाची मायक्रो बाजारपेठ आहे आणि आम्हाला आमच्या पोर्टफोलिओमध्ये हे भूभाग जोडताना खूप आनंद होत आहे. यामुळे पुण्यातील आमचे स्थान आणखी विस्तारेल आणि भारतातील प्रमुख शहरांमधील प्रस्थापित सूक्ष्म बाजारपेठांमध्ये आमचे स्थान आणखी मजबूत करण्याच्या आमच्या रणनीतीशी हे सुसंगत आहे.

 

*सध्याच्या व्यावसायिक गृहितकांच्या आधारावर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading