Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

चिंगी आनंदीला आई म्हणून स्वीकारेल?

चिंगीला शाळेत आनंदी तुझी सावत्र आई म्हणून चिडवायला सुरुवात होते. त्यामुळे चिंगी खूपच दुखावते आणि त्याचे परिणाम घरी दिसू लागतात. चिंगीची चीड चीड सुरु होते. चिंगी आणि आनंदी मध्ये राघवच्या निमित्ताने खूप वाद होतात आणि चिंगी आनंदी पासून दुरावते. चिंगीला तिच्या आईची म्हणजेच रमाची खूप  आठवण येतेय. आनंदी चिंगीशी सर्वतोपरी बोलण्याचा प्रयत्न करतेय पण चिंगी रुसलेय आतून दुखावलेय. राघव दोघांमध्ये पुन्हा मैत्री करण्याचा खूप प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्यात राघव आनंदीच्या अधिकच जवळ येतो! आता राघवला आनंदीच्या प्रेमाची जाणीव होणार का? आनंदी चिंगी मधला अबोला संपणार का? चिंगी आनंदीला आई म्हणून स्वीकारेल? यासाठी पाहायला विसरू नका ‘नवा गडी नव राज्य’ सोमवार ते शनिवार संध्या. ९:०० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading