Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

इंग्लंडच्या ऐतिहासिक ‘हाउस ऑफ लॉर्डस’मध्ये पुण्यातील महेश नामपूरकर यांना पुरस्कार प्रदान

‘मोस्ट क्रिएटिव्ह आर्किटेक्ट ऑफ युरोप अँड एशिया’ पुरस्काराने झाला सन्मान

पुणे : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा आर्किटेक्चर, डिझायनिंग आणि इंटेरियर’च्या माध्यमातून भारतात तसेच अन्य देशांमध्ये आपली वेगळी छाप उमटविणारे पुण्यातील प्रसिद्ध लँडस्केप डिझायनर व वास्तुविशारद महेश नामपूरकर यांचा नुकताच इंग्लंडची राज्यसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक अशा ‘हाउस ऑफ लॉर्डस’मध्ये सन्मान करण्यात आला. याठिकाणी आयोजित शानदार सोहळ्यात नामपूरकर यांना लॉर्ड नवनीत ढोलकिया, ऑर्डर ऑफ ब्रिटीश एम्पायर (ओबीई) डेप्युटी लेफ्टनंट यांच्या हस्ते आणि ब्रिटीश खासदार रुथ कॅडबरी यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘मोस्ट क्रिएटिव्ह आर्किटेक्ट ऑफ युरोप अँड एशिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डब्ल्यूबीआर कॉर्प, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्लंडमधील लंडन येथे आयोजित इंडो-युके बिजनेस कॉनक्लेव्ह २०२२ अंतर्गत उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना ग्लोबल बिझनेस एक्सेलन्स पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. यावेळी नामपूरकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे यंदा प्रथमच आर्किटेक्चर आणि डिझायनिंग’साठी पुरस्कार देण्यात येत असून, नामपूरकर हे हा पुरस्कार मिळविणारे पहिले पुरस्कारार्थी ठरले आहेत. याप्रसंगी नामपूरकर यांच्या पत्नी आणि सुमन शिल्प’च्या सहयोगी उमा नामपूरकर यादेखील उपस्थित होत्या.

लँडस्केप, आर्किटेक्चर आणि इंटेरिअर क्षेत्रातील सुमारे ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नामपूरकर यांनी भारतात तसेच भारताबाहेर अनेक महत्व पूर्ण प्रकल्पांसाठी काम केले आहे. यामध्ये पुण्यातील सूस परीसरातील सनी’ज वर्ल्ड, पानशेत परिसरातील शिलीम येथील हॉटेल हिल्टन, हडपसर येथील अमेनोरा क्लब हाउस, नाशिक येथील विवेदा वेलनेस रिसोर्ट, महाबळेश्वर येथील हॉटेल ली मेरेडीयन आणि कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेची महाविद्यालये, हॉटेल सयाजी याचबरोबर भारताबाहेर दोहा, कतार, दुबई , सिंगापूर आणि इंडोनेशिया देशातील विविध प्रकल्पांचा समावेश आहे. रचनेतील नावीन्यतेसोबतच, पर्यावरणपूरकता आणि शाश्वतता हे नामपूरकर यांच्या कार्याचे वैशिष्ट्य मानले जाते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading