बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी विजय शिवतारे यांची नियुक्ती
पुणे:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्ते पदी विजय शिवतारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे.
विजय शिवतारे हे आता शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांच्या सोबत शिंदे गटाची बाजू मांडताना दिसणार आहेत. त दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी मंत्री राहिलेल्या विजय शिवतारे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागावरून पक्षातून हकालपट्टी केली होती. हकालपट्टीनंतर पुण्यात शिवतारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी शिवसेना आहे असे सांगितले होते. दरम्यान शिवतारे यांना प्रवक्तेपद मिळाल्याने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटातील संघर्षात ते त्यांच्या गटाची बाजू आक्रमक पणे मांडतील असे बोलले जात आहे.
