Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

अजित दादांची गॅरंटी नाही -डॉ. निलम गोऱ्हे

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण प्रत्येक पक्षाच्या नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे दावे केले जात आहेत.विशेष म्हणजे काही अनपेक्षित राजकीय घडामोडी देखील समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिर्डीतील चिंतन शिबिराच्या दुसऱ्या दिवशी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आजारी असूनही सहभागी झाले. पण त्याचवेळी या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवारांची अनुपस्थिती बघायला मिळाल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. अजित पवार हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. या चर्चांनंतर शिवसेनेच्या नेत्या व विधानसभेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना ‘अजित दादांची गॅरंटी नाही’ .असं स्पष्ट विधान केलंय

निलम गोऱ्हे म्हणाल्या, पूर्वी गिरीश बापट पालकमंत्री होते तेव्हा मला माहिती आहे, म्हणजे मी पाहिलेलं आहे, फक्त आरोप म्हणून आरोप करत नाहीय. गिरीश बापट राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रेमाने निधी द्यायचे. आता तसं राहीलं नाही. कारण आता बरंच पाणी वाहून गेलंय. महाविकास आघाडी तयार झालीय. त्याचबरोबर अजित पवारांची कुणालाच गॅरंटी नाहीय. परत त्यांना बारामतीत सुप्रिया सुळेंचा पराभव करायचा आहे. पूर्वी जसे संताजी-धनाजी दिसायचे तसं आमची मविआ सहकारी दिसत आहेत. मला तर आमदार म्हणून अजिबात निधी दिला नव्हता. आम्ही काल-परवा  खूप पाठपुरावा केल्यावर थोडाफार निधी देतो सांगितलं. तीन-तीन वर्ष कामं मंजूर झाल्यानंतरही निधी मिळत नव्हता’.अशी सविस्तर प्रतिक्रिया निलम गोऱ्हे यांनी दिलीय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading