बाळा नांदगावकर यांनी बापट यांची भेट घेतली; मनपा निवडणुकीमध्ये मनसे-भाजप युती होणार?
पुणे:राज्यात दिवाळीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचे शिलेदार म्हणजे बाळा नांदगावकर यांनी आज पुण्याचे भाजप खासदार गिरीष बापट यांची भेट घेतली आहे. यामुळे पुण्यात महानगरपालिका निवडणुकीमध्ये मनसे-भाजप युती तर होणार नाही .ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
त्यांच्यात सुमारे दोन तास चर्चा झाली. यावेळी नांदगावकर यांनी बापट यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.
राज ठाकरे यांचं पुण्यावर नेहमीच लक्ष राहील आहे. यामुळे ते पुण्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी भाजप सोबत युती करण्याचा विचार करू शकतात. मात्र.याबाबत अद्याप स्पष्टता नाही
