Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

फिक्की महिला उद्योजिका राष्ट्रीय प्रदर्शनाचे 8 नोव्हेंबर रोजी पुण्यात आयोजन

पुणे : फिक्की महिला आघडी पुणे यांच्या वतीने येत्या 8 ऑक्टोंबर 2022 रोजी पुण्यातील ऑक्सफर्ड रिसोर्ट बावधन येथे महिला उद्योजिकाचे राष्ट्रीय प्रदर्शन व विविध कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे .या कार्यक्रमास देशभरातील फिक्की महिला आघाडीच्या उद्योजिका सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुप्रसिध्द अभिनेता जॅकी श्रॉफ व शत्रुघ्न सिन्हा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत .जागतिक शांततेसाठी उभारल्या जाणाऱ्या शांतता स्तंभाचे उद्घाटन या दोन दिवसीय कार्यक्रमात होणार आहे .
8 आणि 9 नोव्हेंबर 2022 रोजी दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे . महाराष्ट्राची लोकधारा,संस्कृती तसेच इतिहास सांगणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .तसेच महाराष्ट्राची पंगत ही या कार्यक्रमात अनुभवण्यास मिळणार आहे .तसेच कोटक महेंद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश शहा हे महिला उद्योजिकाना मार्गदर्शन करणार आहेत .यावेळी हस्तकला तसेच विविध दुर्मिळ वस्तू व कलेचा अनुभव घेता येणार आहे .या महोत्सवास फिक्की महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा जयंती दालमिया उपस्थित रहाणार आहेत त्यांच्या उपस्थितीत संस्थेचा 8 वर्धपान दिन साजरा करण्यात येणार आहे .तसेच यावेळी महिलांच्या गोल्फ टुर्नामेंट चे आयोजन करण्यात आले आहे .अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजक व पुणे फिक्की च्या अध्यक्षा नीलम सेवलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली . यावेळी फिक्की च्या माजी अध्यक्षा उषा पूनावाला ,उपाध्यक्षा रेखा मगर , खजिनदार सोनिया राव, सेक्रटरी अनिता अग्रवाल ,पिंकी राजपाल व इतर फिक्की महिला पदाधिकारी उपस्थित होत्या .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading