Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पद भरतीसाठी कोण आंदोलन करत असेल तर करू द्या चंद्रकांत पाटील यांचा जयंत पाटील यांना टोला

पुणे: आज पुण्यात जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातील लाखो तरुणांचा आशेचा किरण असणारी पोलीस भरती रद्द केल्याच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यावर सरकारी नोकरीची एक मर्यादा आहे
सरकारी नोकरीची एक मर्यादा आहे.प्रक्रिया सुरू झाली आहे.पद भरतीसाठी कोण आंदोलन करत असेल तर करू द्या. असे बोलून भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांना टोला लगावला.
राज्यात ग्राम विकास भरती ही रखडली होती. त्यावर लवकरच राज्यात ग्रामविकास विभागात वीस हजार पदांची भरती होणार आहे. ही घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.
सामनाच्या पहिल्या पानावर सरकारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. ज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सामनातील ही जाहिरात पोस्ट करत ‘खोके’ सामना मध्ये पोहचले का ? असा सवाल उपस्थित केला आहे.आजकाल कशावरही टीका केली जाते.सामना शिवसेनेचे मुखपत्र असलं तरी तो एक कमर्शियल पेपर आहे ते कुणाच्याही जाहिराती देऊ शकतात.
आता कुठल्या पानावर जाहिरात छापायची ते त्यांच्या मनावर आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
जयंत पाटील यांनी शिंदे व फडणवीस सरकारवर
ग्रामविकास योजनेमध्ये 50खोके घेतले असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.खोक्यांचा अर्थ म्हणजे आंब्यासाठी वापरले जाणारे खोके हाच आमच्यासारख्या सामान्यांचा अर्थ आहे.आमच्यावर टीका करणाऱ्याचे माझ्याकडे दहा विषय आहेत.
ग्रामविकासात पंधराशे कोटी रुपयांच्या टेंडरचा घोटाळा .त्या खोक्यांची सवय तुम्हालाच आहे.
जयंत पाटील यांनी खोक्यांचा वेगळा अनुभव वर्षानुवर्ष घेतल्यामुळे महाराष्ट्राची वाट लागली आहे. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांच्यावर केला.
महाविकास आघाडी सरकारच्या बऱ्याच योजना शिंदे फडणवीस सरकारने बंद केल्या असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावरसरकार ही नियमित चालणारी प्रक्रिया आहे.2014 ते 19 मध्ये आम्ही प्रचंड निर्णय केले.आणि जर ते निर्णय यांच्या सरकारमध्ये मार्गी लागले असते तर आम्ही म्हणायचं का की आमच्या योजना केल्या.
आम्ही आता सगळ्या योजना नव्याने तयार करत आहोत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुका कधी होणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. पण हा अजून मॅटर सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. विरोधक महानगरपालिका निवडणूक घ्यायला शिंदे व फडणवीस सरकार घाबरत आहेत. असे म्हणत आहेत. त्यावर पाटीलम्हणाले,त्यामुळे सरकार निवडणुकाला घाबरत वगैरे अशा टीका करणे योग्य नाही. ज्यांचं डिपॉझिट जप्त होतं अशा लोकांनी निवडणुका जवळ आल्यावर आम्ही जिंकणार असं दाव करणे किती योग्य आहे.असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रात येत आहे. पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना विचारले की तुम्ही राहुल गांधी यांना शुभेच्छा देणार आहात का.मी शुभेच्छा देण्याचे काय कारण प्रत्येकाला आपली पार्टी वाढवायचा अधिकार आहे पण यापूर्वी देखील राहुल गांधींनी असे अनेक प्रयोग केले असून त्यात त्यांना यश आलं नाही. अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading