Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिंदे फडणवीस सरकार विरोधी पक्षातील लोकांची कोंडी करत आहेत – भास्कर जाधव

पुणे:ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात अपमानास्पद आणि शिरवाळ भाषा वापरुन सामाजिक भावना दुखावल्याचा आरोप जाधव यांच्यावर करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज भास्कर जाधव यांचा डेक्कन पोलीस स्टेशन ने जवाब नोंदविला.पुणे कोर्टाकडून भास्कर जाधव यांना हंगामी अटकपुर्व जामिन मंजूर मिळाला. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

भास्कर जाधव म्हणाले,शिंदे फडणवीस सरकार विरोधी पक्षातील लोकांची कोंडी करत आहेत. तसेच माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यात काही तथ्य नाही असं यावेळी भास्कर जाधव म्हणाले. पोलीस दडपणाखाली आहेत असा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले,कायद्याचा सन्मान राखत आज डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये हजर राहिलो. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे. हे सरकार सगळे नियम पायदळी तुडवत आहेत. मविआ सरकारने चांगले काम करत अनेक प्रकल्प आणले. कोरोना सामना करत काम केलं. मात्र केंद्र आणि राज्य सरकार एकाच विचारच झालं मात्र आता मविआ सरकारच्या काळात आलेले अनेक प्रकल्प आता जात आहेत. एकनाथ शिंदे म्हटले माझ्यामागे महाशक्ति आहे पण आता महाराष्ट् खिळखीळ करण्याचं काम सुरू आहे. असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव म्हणाले, देवेंद्र फडणवीस बोलण्यात फार चलाख आहेत. यांच्या मध्यस्थीमुळे रवी राणा बच्चू कडू याचे वाद मिटला त्याचबरोबर रवी राणा बच्चू कडू याचे वाद होत राहो याच शुभेच्छा असंही ते म्हणालेत.
भास्कर जाधव पत्रकारावर का भडकले बघा
भास्कर जाधव यांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला तुम्ही एकनाथ शिंदे गटात जाणार होतात पण स्वतः मुख्यमंत्री यांनी तुम्हाला तिथे येण्यास नकार दिला’ त्यावर भास्कर जाधव म्हणाले की, तुम्ही कधी एकनाथ शिंदेंना भेटला? मला महाराष्ट्रात पहिल्यांदा तुम्ही भेटत आहात जे हे असं सांगत आहेत. एकनाथ शिंदे यांना तुम्ही भेटून आला का? त्यांनी तुम्हाला हे सांगितले का? काय प्रश्न विचारत आहात? असे भास्कर जाधव म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading