Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

गुजरातपेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देतील एवढं मोदी-शाहांचं मोठं मन नाही – भास्कर जाधव

पुणे: वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरले आहे. त्यावर मोदी-शाह यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात देणार आहेत,.असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. तो अजूनही कोणता होता हे जनतेला कळलं नाही. मात्र त्यानंतर चार प्रकल्प राज्याबाहेर गेलेत. तरीही मुख्यमंत्री अजून मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येतील असं सांगत आहेत. गुजरातपेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देतील एवढं मोदी-शाहांचं मोठं मन नाही. अशी टीका ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी पुण्यात पत्रकारांची संवाद असताना मोदींवर केली.
जाधव म्हणाले, मोठं मन असेल तर लहान प्रकल्प महाराष्ट्रात देण्याइतपत आहे. असा हल्लाबोल जाधव यांनी सरकारविरोधी केला आहे.
विरोधी पक्ष हा देखील सत्ताधारी पक्षाला लोकशाहीमध्ये बरोबरीने आणि सक्षम असावा लागतो. मात्र वेगवेगळ्या माध्यमातून विरोधी पक्ष संपवून टाकायचा. त्यामुळे आपल्याचं लोकांना सुरक्षा पुरवायची असं सध्या सुरु आहे. राज्यकर्त्यांनी सगळ्यांना समान वागणूक द्यावी. आपल्यापेक्षा दुसऱ्याचा विचार करावा मात्र तसं न करता फक्त आपल्याच लोकांना सुरक्षा देत आहेत. यापूर्वीचे देखील अनेक उदाहरणं आपल्यापुढे आहेत. राज्याने जर सुरक्षा पुरवली नाही तर कंगना रानौत, किरीट सोमय्या यांना केंद्रातून सुरक्षा देण्यात आली होती. आता तर केंद्रात आणि राज्यात देखील त्यांचंच सरकार आहे. त्यामुळे ते कोणतीही सुरक्षा कोणालाही देऊ शकतात. मात्र विरोधक मारुन लोकशाही संपवू शकत नाही, असंही भास्कर जाधव म्हणाले.
विरोधक सत्ताधाऱ्यांवर सारखे पन्नास खोके घेतले असा आरोप करत आहेत.पन्नास खोक्यांचं राजकारण काय आहे? हे संपूर्ण महाराष्ट्राला कळलं आहे. हे खोके आता मोठ्यांच्या तोंडापर्यंत गेले आहेत. मात्र सर्वसामान्यांना 100 रुपयांत दिवाळी करा असं सांगायचं आणि शिधा तुळशीच्या लग्नापर्यंत देतो म्हणून सांगायचं आणि जनतेची चेष्टा करावी, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. असे भास्कर जाधव म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading