Gujrat – मच्छू नदीवरील पूल कोसळल्याने ५०० बुडाले,४० जणांचा मृत्यू
अहमदाबाद : गुजरातमध्ये मोरबी येथील मच्छू नदीवर असलेला केबल पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत ५०० नागरिक बुडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यन्त ४० नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पाच दिवसांपूर्वी या पुलाच्या दुरुस्थीचे कम करण्यात आले होते. त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू करण्यात आला होता. मात्र, पाच दिवसानंतर आज ही मोठी दुर्घटना घडली. एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
गुजरातमधील मोरबी येथे माच्छू नदीवर छठ पूजासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. या ठिकाणी असलेल्या केबल पुलावर तब्बल चारशे पेक्षा जास्त नागरिक होते. हा पूल नदीत कोसल्याने पूलावारील सर्व नागरिक बुडल्याची माहिती मिळत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच बचवकार्य वेगानं सुरु करण्यात आले आहे. रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
बचाव पथकाने काही नागरिकांना नदीतून बाहेर काढले आहे. त्यांना जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर काही नागरिकांचा शोध सुरू आहे. नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. रविवार सुट्टी असल्याने या पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी होती. या घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दुख: व्यक्त केले आहे. ते म्हणाले, मोरबी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे दुख: झाले आहे. बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक नगरिकांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मी या घटनेवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबद्दल दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.
तसेच, आम आदमी पक्षाचे प्रमुख तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील ट्वीट करत या दुर्घटनेवर दुख: व्यक्त केले.
