Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Pune – शिंदे गटाकडून ‘उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा’ बॅनर मधून उद्धव ठाकरे वर निशाणा

पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सुरु झालेला उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील वाद संपण्याचे नाव घेताना दिसत नाहीये, राजकीय क्षेत्रात ठाकरे गट आणि शिंदे गट अनेक प्रसंगी एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे पाहायला मिळाले आहे.सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपा दरम्यान पुण्यातील फर्ग्युसन रोड, जंगली महाराज रोडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेच्या युवा सेनेमार्फत ठिकठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणारे, ‘उद्धवचा वाटा महाराष्ट्राचा घाटा’ असे फ्लेक्स लावले आहेत.त्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना. महाराष्ट्रामधून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत.त्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.हे फ्लेक्स शहरातील नागरिकाचे लक्ष्य वेधून घेत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading