नेक्स्ट एज्युकेशनने गाठला मैलाचा टप्पा
मुंबई : भारतातील के-१२ अर्थात केजी ते दहावीच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणणारी, वेगाने विस्तारत असलेली तंत्रज्ञानाधारित कंपनी नेक्स्ट एज्युकेशन आपली १५वी वर्षपूर्ती साजरी करत असून आपल्या इथवरच्या वाटचालीमध्ये कंपनीने अनेक मैलाचे टप्पे गाठल्यानंतर आणि अनेक मानसन्मान मिळविले आहेत. कंपनीद्वारे भारतभरातील आणि यूएईमधील १८,००० हून अधिक शाळांना नव्या युगाला साजेशा, अभिनव अध्ययन आणि अध्यापन उपाययोजना पुरविल्या जात आहेत.
आयआयटीतून बाहेर पडलेल्या रवींद्रनाथ कामत आणि बियास देव राल्हान या दोघांनी २००७ साली सुरू केलेल्या नेक्स्ट एज्युकेशनने भारतातील के-१२ सेक्टरला सर्वाधिक सर्वसमावेशक बी२बी, सास आधारित, इत्यंभूत सेवा पुरविणारी कंपनी म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाचे लोकशाहीकरण करणे आणि बदलांना चालना देणे या कंपनीच्या ध्येयाने त्यांना सातत्याने आगळ्यावेगळ्या उपाययोजना अंमलात आणण्याचे बळ दिले आहे. गेल्या दीड दशकामध्ये त्यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी नेक्स्टकरिक्युलम, नेक्स्टलॅब्स, टीचनेक्स्ट, नेक्स्टओएस आणि नेक्स्ट स्कूल यांच्यासह अनेक खास गरजांबरहुकुम तयार केलेल्या उपाययोजनांचा संच उपलब्ध करून दिला आहे.
नेक्स्ट एज्युकेशनचे सीईओ बियास देव राल्हान म्हणाले, “या कंपनीच्या संकल्पनेपासूनच आम्ही विद्यार्थ्यांमध्ये २१व्या शतकाला साजेशी कौशल्ये रुजवून त्यांना भविष्यासाठी सज्ज बनविणा-या उपाययोजना उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. आपल्या क्षेत्रातील सर्वोत्तम उपाययोजनांच्या साथीने विद्यार्थी, शैक्षणिक संस्था आणि इतर संबंधित घटकांना सुसज्ज बनविण्यावर आम्ही नेहमीच आपले लक्ष केंद्रित केले आहे. आमच्या संस्थापनेपासूनच आम्ही आमच्या उत्पादनांच्या पर्यायांची व्याप्ती वाढवली आहे आणि आमच्या पार्टनर शाळांना तंत्रज्ञानावर आधारित उपाययोजना पुरविल्या आहेत, जेणेकरून शिक्षण अधिक परवडण्याजोगे व सहज उपलब्ध व्हावे. वाढीचा हा वेग आगामी वर्षांमध्येही कायम राखण्याची आमची योजना आहे. सध्यापुरते सांगायचे झाले तर आम्ही आम्ही नवीन युगाला साजेशा तंत्रज्ञानाच्या साथीने शैक्षणिक क्षेत्राला अधिक बळकट बनविण्याच्या दिशेने काम करत आहोत.”
अलीकडेच कंपनीने नेक्स्ट३६० नावाचा सर्वसमावेशक शालेय संच बाजारात आणला आहे, जो अध्ययन व्यवस्थापन उपाययोजना, व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरणारी साधने, डिजिटल कन्टेन्ट, व्हर्च्युअल प्रयोगशाळा, एकात्मिक अभ्यासक्रम आणि तांत्रिक सहाय्य अशा सर्व गोष्टी पुरवितो. त्यांच्या नाविन्यपूर्ण उत्पादने आणि उपाययोजनांनी भारतातील खासगी शाळांत शिकणा-या मुलांपैकी सुमारे १० टक्के मुलांच्या दैनंदिन आयुष्यात परिवर्तन घडवून आणले आहे. नेक्स्ट एज्युकेशनने भारतातील तसेच परदेशातीलही शाळांशी भागीदारी केली आहे.
