Friday, May 29, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

तीन मोठे प्रकल्प गुजरातला कसे गेले यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी – सुप्रिया सुळे


पुणे:महाराष्ट्रातील तीन मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. तूतू-मैंमैं करण्यापेक्षा राज्यात जास्तीत जास्त प्रकल्प कसे येतील याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. अशा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीपुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
चार ते पाच प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले आहेत.
कल्प बाहेर गेल्यावर त्याचं खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडायचं, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.
प्रकल्प राज्याबाहेर जाण्याला आमचा विरोध नाही, परंतु जे प्रकल्प महाराष्ट्रात येणार होते तेच प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत. असं का होतंय, याचं उत्तर मिळायला हवं. तसेच याची जबाबदारी देखील ईडी सरकारने घ्यायला हवी. असंही सुळे म्हणाल्या.
दु:ख नसलं तरी महाराष्ट्रातून हे प्रकल्प का गेले याचा अभ्यास व्हायला हवा. महाराष्ट्र सर्व बाबतीत सरस असूनही हे प्रकल्प राज्याबाहेर का गेले? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,मी कोणावरही थेट आरोप करत नाही. विद्यमान सरकारमधील मंत्री महाविकास आघाडी सरकारमध्येही होते. तेव्हा ते झोपलेले होते का? महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना हे लोक सर्व कार्यक्रमात, फोटोंमध्ये दिसत होते. सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत असलेले आरोप हास्यास्पद आहेत . अशी टीका सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
नितीन गडकरी पारदर्शक काम करतात, ते सर्वसमावेशक आहेत, सर्वांना सोबत घेऊन जातात. ते पक्ष बघत नाही, ते सर्वांचे काम करतात’ असं म्हणत सुळे यांनी गडकरींचं कौतुक केलं.
बच्चू कडू उगाच आरोप करत नाही, सत्तेत असणारे संवेदनशील आहेत, याच मनापासून स्वागत करते, मंत्रीच म्हणतात तुम्हाला खोके पाहिजे का ? पन्नास खोक्याची चर्चा आज वाड्या वस्त्यावर होत आहे. बच्चू कडू यांचे मी स्वागत करते.असंही सुळे म्हणाल्या.
‘ईडी सरकार मेळव्यांमध्ये व्यस्त आहे. मंत्रालयात कुणीच नसते, राज्यासाठी सर्व एकत्र येऊया, राज्य अडचणीत आहेत. ज्या मराठी संस्कृतीत हे बसत नाही, महाराष्ट्रासमोर खूप आव्हानं आहेत, याकडे मी बघत नाही’, अब्दुल सत्तारांच्या टीकेला उत्तर दिलं.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading