Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

कष्टकरी सफाई कामगार आणि रिक्षाचालक यांची दिवाळी गोड

पुणे:बोपोडी येथे प्रभागातील कष्टकरी सफाई कामगार आरोग्य कर्मचारी आणि रिक्षा चालक यांच्या समवेत दिवाळी स्नेहभेट समारंभाचे आयोजन पुण्याच्या मा.उपमहापौर सौ.सुनिता परशुराम वाडेकर आणि मित्र परिवाराच्या वतीने बोपोडी येथील सम्यक विहार व विकास केंद्र या जनसंपर्क कार्यालयात आयोजन करण्यात आले होते.*
या समारंभाचे आयोजन गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने केले जात आहे.यावेळी प्रभागातील औंध क्षेत्रीय कार्यालय,औंध,बाबुराव शेवाळे हॉस्पिटल ,चिखलवाडी आरोग्य, बोपोडी आरोग्य ,तसेच संजय गांधी रुग्णालय आरोग्य कोठी येथील सफाई कर्मचारी आणि मुकादम तसेच प्रभागातील सुमारे 600 ते 650 रिक्षा चालक बंधू यांना दिवाळी स्नेहभेट देण्यात आली.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक अनिल द्विवेदी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.तसेच पुण्यनगरीच्या मा.उपमहापौर सौ. सुनिता परशुराम वाडेकर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र प्रदेशाचे संघटन सचिव मा.परशुराम वाडेकर,सदस्य मंदार जोशी,पुणे बार असोसिएशनच्या अर्चिता जोशी, आरोग्य मुकादम सिद्धार्थ बागुल, सुरेश गायकवाड, शेलार,अनिल शिंदे,आरोग्य निरीक्षक योगेश जाधव, तसेच आरोग्य कर्मचारी आणि प्रभागातील रिक्षाचालक बहुसंख्येने उपस्थित होते.
समारंभ यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवाजीनगरचे विधानसभा अध्यक्ष अविनाश कदम,युवक अध्यक्ष महादेव साळवे कार्याध्यक्ष भिमा गायकवाड, उपाध्यक्ष निलेश वाघमारे,सचिव राजेंद्र शिंदे ,सचिन चव्हाण,माजी पुणे युवक जिल्हाध्यक्ष उमेश कांबळे,युवक जिल्हाध्यक्ष प्रविण ओव्हाळ,,राजेश माने,शहर युवक उपाध्यक्ष आकाश बहुले,मुळशी तालुका युवक अध्यक्ष विशाल शेळके, रिपाई पुणे शहर उपाध्यक्ष ज्वेल अँथोनी ,पुणे शहर उपाध्यक्ष भीमराव वाघमारे सुप्रियाताई निकाळजे,अमर खंडागळे,संदीप धांहदोरे लियाकतभाई शेख, रमेश ओव्हाळ,(भांडेवाले) व रिक्षा संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उपाध्यक्ष संदीप तायडे,निलेश वाघमारे,संघटक सचिव राजेंद्र शिंदे,अप्पासाहेब वाडेकर,अनेश रोकडे,रिकेश पिल्ले,सुशांत भंडारी,बाळासाहेब मोरे ,सादिकभाई शेख ,बापू रणदिवे ,कैलास कांबळे ,विलास जाधव रुपेश, पिल्ले अनिस रोकडे,बोपोडी ब्लॉक अध्यक्ष सुरेंद्र आठवले अध्यक्ष नंदाताई निकाळजे, मनीषा पाटील, माहेश्वरी गायकवाड ,स्नेहल पिंगळे ,कलावती भंडारे विलास जाधव,राजश्री कांबळे,निखिल आढाव,स्वप्निल गजरमल,संजय गजरमल,रमेश खरात ,ज्ञानेश्वर लहाने,अजिंक्य गाडे,सुरज समिंदर ,प्रदीप ठोसर, शिवाअण्णा पिल्ले,विनीत चौधरी अनिल जोशी,महेश गायकवाड साहील डोळस,चाँद शेख,योगेश बोडरे गंगाराम गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमा प्रसंगी आदी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे निवेदन ॲड.ज्ञानेश जावीर यांनी केले.तर छायाचित्रण जेष्ठ छायाचित्रकार विजय सोनीगरा यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading