Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेत नव्याने समाविष्ट केलीली गावे वगळावी -विजय शिवतारे


पुणे:पुरंदरहवेली विधानसभा मतदार संघातील गावांमध्ये पायाभूत सुविधांची वानवा असताना पुणे महापालिकेने समाविष्ट गावांना मनमानी पद्धतीने मिळकतकर आकारणी केली आहे. त्यामुळे मिळकतकर कमी करावा किंवा गावांना महापालिका हद्दीतून वगळण्यात यावे आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत म्हणून या गावांना पुुन्हा पूर्वीचा दर्जा द्यावा.व नवीन 23 गावची समाविष्ट केली आहेत ती महानगरपालिकेतून वगळावी.अशी मागणी माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी आज केली आहे.

विजय शिवतरे यांनी नागरिकांची मत जाणून घेण्यासाठी आज पुण्यात उरळी देवाची ते बैठक घेतली तेव्हा ते बोलत होते.
विजय शिवतरे म्हणाले,महापालिका हद्दीत गावांचा टप्प्याटप्याने समावेश झाल्यानंतर त्यांना महापालिकेकडून मिळकतकर आकारणी करण्यात आली. महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतरही नागरी सुविधा महापालिकेकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.अशा तक्रारी स्थानिक नागरिकांनी सातत्याने केल्या आहेत. पाणीपुरवठ्याबाबत आणि रस्त्यांबाबतही तक्रारी आहेत. गावातील मिळकतींना ग्रामपंचायतींनी निश्चित केलेल्या मिळकतकरातही केलेल्या वाढीबाबत नाराजी आहे. त्यामुळे यासंदर्भात विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. मिळकतकर करातून नागरिकांना दिलासा देता येत नसेल तर पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायती पुनर्स्थापित करावी, गावांना महापालिका हद्दीतून वगळण्यात यावे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर बैठक घ्यावी. अशी मागणी विजय शिवतारे यांनी केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading