Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

‘साखळीपीर’, जय आनंद ग्रुपने केली वंचित-संचितांची दिवाळी आनंदमय

पुणे : साखळीपीर तालिम राष्ट्रीय मारुती मंदीर, जय आनंद ग्रुप संचालित ऋषीआनंदवन व लायन्स क्लब ऑफ पुणे सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने वंचित-संचितांची दिवाळी साजरी करण्यात आली. जैन साध्वी इंद्रकवरजी महाराज साहब यांच्या जयंतीनिमित्त ‘समाजधनपुजन’ करण्यात आले. यावेळी १०० गरजू परिवारांना दिवाळीनिमित्त दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.

वंचितांची व संचितांची एकत्रीत दिवाळी व समाजातील उपेक्षित घटकांना अभ्यंगस्नान घालुन, औक्षण करुन त्यांना नविन कपडे-साडीचोळी देऊन फराळ वाटप करण्याचे हे विसावे वर्ष आहे. यासह वर्षभर कार्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचारी, फायर ब्रिगेड जवान, मनपा सफाई कर्मचारी यांचे औक्षण करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.

धनत्रयोदशीच्या निमित्ताने नाना पेठेतील साखळीपीर तालिम चौकात झालेल्या या कार्यक्रमावेळी रविंद्र माळवदकर, विजयकुमार मर्लेचा, भाई कात्रे, शिवानी माळवदकर, जयप्रकाश सोनी, शांतीलाल नवलाखा, ईश्वर बोरा, संजय कटारिया, संतोष कर्नावट, प्रवीण तालेडा, विजय धोका, नितीन ओस्तवाल, विजय चोरडिया, रमणलाल कोठारी, बबन लाहोटी, रमेश लाहोटी आदी उपस्थित होते.
जय आनंद ग्रुपचे सदस्य संतोष भुरट यांच्या धर्मपत्नी प्रतिभा भुरट व शांतीलाल नवलखा यांच्या मातोश्री श्रीमती चांदकॅंवर बाई दगडूलालजी नवलाखा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम घडविण्यासाठी जय आनंद ग्रुप, पुणे संचलित ऋषी आनंदवनचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा व कार्याध्यक्ष विजय चोरडिया यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading